पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:48 AM2019-07-30T10:48:05+5:302019-07-30T10:48:27+5:30

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला सोमवारी जोरदार दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

Court slaps Nishant Agarwal for spying Pakistan | पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला न्यायालयाचा दणका

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला न्यायालयाचा दणका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला सोमवारी जोरदार दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. निशांत ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर शाखेत अभियंता होता. येथील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर प्रदेश एटीएसने ८ आॅक्टोबर २०१८ रोजी नागपूर येथून अटक केली होती. त्यानंतर निशांतच्या संगणकात गोपनीय माहिती आढळून आली होती. तो एका महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. त्यातून तो त्या महिलेला गोपनीय माहिती पुरवित होता. ती माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचत होती. नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांततर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Court slaps Nishant Agarwal for spying Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.