Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:58 AM2020-04-11T08:58:12+5:302020-04-11T08:58:42+5:30

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.

Covid-29 drug at a pharma unit in Nagpur; | Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

Next
ठळक मुद्देइन्व्हेंटिस रिसर्च कंपनी

सोपान पांढरीपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.
इन्व्हेंटिस रिसर्चचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक बी. बिरेवार यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. मूळचे हे औषध जपानच्या फुजी केमिकल इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडने तयार केले आहे आणि अनेक प्रकारच्या ‘एन्फ्लुएन्झा’ प्रकारच्या आजारांवर प्रभावी असल्याचे डॉ. बिरेवार यांनी सांगितले. व्यावसायिक कारणासाठी कंपनीला या चाचण्या आयोजित करण्यासाठी फुजी केमिकल इंडस्ट्रीजची परवानगी मिळाली नाही. पण जर आम्ही चाचण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच परवानगी मिळेल, असे डॉ. बिरेवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
‘फ्लाविपिरॅव्हिर’ एक सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) किंवा बल्क ड्रग फुजी केमिकल इंडस्ट्रीजने विकसित केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी मानले जाणारे जगप्रसिद्ध औषध ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याचा कंपनी ‘फ्लाविपिरॅव्हिर’ सोबत प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये दररोज २० ते ३० लाख गोळ्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याची क्षमता आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ही क्षमता कमी पडत आहे. बिरेवार म्हणाले, सरकारने ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ औषधावरील निर्यात बंदीदेखील काढून टाकली आहे. त्यामुळे या औषधाची निर्यात क्षमता वाढली आहे. आम्ही जवळपास एका महिन्यात ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ आणि पुढील अडीच महिन्यात ‘फ्लाविपिरॅव्हिर’ विकसित करण्याची योजना आखली आहे, असेही ते आत्मविश्वासाने म्हणाले.
इन्व्हेंटिस रिसर्च ही चंद्रपूर आधारित मल्टी आॅर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असून सन १९७६ मध्ये बाबूराव व्ही. बिरेवार यांनी स्थापन केली. कंपनी अजूनही शेती, फार्मास्युटिकल्स, औषधे, प्लास्टिक आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी आवश्यक औषधे आणि सेंद्रीय रसायने तयार करते. इन्व्हेंटिस कंपनीची स्थापना डॉ. दीपक बिरेवार यांनी सन २०१४ मध्ये केली होती आणि कंपनीचे कामकाज संपूर्ण भारतात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीने सुरू आहे. कंपनीने २०१५ मध्ये फार्मा स्टार्टअपचा ईटी पुरस्कारही जिंकला आहे.

 

Web Title: Covid-29 drug at a pharma unit in Nagpur;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.