नागपुरात सहा केंद्रांवर कोविडची आरटीपीसीआर चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 09:25 PM2020-08-29T21:25:03+5:302020-08-29T21:27:19+5:30
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉ कॉलेज, मॉरिस कॉलेज, आर.पी.टी.एस, रविभवन, राजनगर व पाचपावली येथील सहा केंद्रांवर आरटीपीसीआर चाचणी शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
कोविड-१९ चे संक्रमण शोधून काढण्यासाठी अॅन्टिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट याप्रमाणे दोनप्रकारे चाचण्या घेतल्या जातात. त्यापैकी अॅन्टिजेन टेस्ट ही रॅपिड टेस्ट आहे व त्यामध्ये त्वरित अहवाल येतो. आरटीपीसीआर टेस्टची तपासणी प्रयोगशाळेद्वारे केली जाते. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, माफसू व एम्स येथील परीक्षणासाठी आलेले सॅम्पल मोठ्या प्रमाणात वाढल्याने कामाचा ताण वाढला तसेच तेथील काही कर्मचारीदेखील पॉझिटिव्ह आले आहेत.
आरटीपीसीआर कोविड चाचणीकरिता तूर्त सॅम्पल पाठवू नयेत, अशी त्यांनी विनंती केल्यामुळे दोन दिवस आरटीपीसीआर सॅम्पल घेण्यात आले नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.