मनपा केंद्रामध्ये रविवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:57+5:302021-07-11T04:06:57+5:30
या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल तसेच तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. १८ वर्षांवरील व ४५ ...
या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल तसेच तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे.
------------------
- ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोज दिला जाईल.
- आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे.
- ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत होईल.