महापालिका केंद्रांमध्ये आज कोविशिल्ड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:41+5:302021-08-18T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे बुधवारी महापालिकेसह सरकारी केंद्रांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारकडून कोविशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे बुधवारी महापालिकेसह सरकारी केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. या केंद्रांवर कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
लसीकरणासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी नोंदणी करता येईल; तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्रावरही १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण होईल, अशी माहिती वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
वय १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कामठी रोड व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, महापालिका स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाॅल येथे उपलब्ध आहे.