आज कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:00+5:302021-07-27T04:09:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारकडून सोमवारी कोव्हिशिल्ड लसी उपलब्ध झाल्याने मंगळवारी १८ वर्षावरील नागरिकांना महापालिका व सरकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारकडून सोमवारी कोव्हिशिल्ड लसी उपलब्ध झाल्याने मंगळवारी १८ वर्षावरील नागरिकांना महापालिका व सरकारी केंद्रावर कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाणार आहे.
लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या महापालिका आणि अन्य सरकारी केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅिक्सन लस उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय व स्व.प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.
केन्द्र शासनाच्या नवीन निदेर्शानुसार ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल.