वीज काेसळून गाईचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:04+5:302021-06-04T04:08:04+5:30
सावनेर : जाेरात कडाडलेली वीज थेट गाईजवळ काेसळली. यात हाेरपळल्याने गाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वासरू गंभीर जखमी झाले. ...
सावनेर : जाेरात कडाडलेली वीज थेट गाईजवळ काेसळली. यात हाेरपळल्याने गाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वासरू गंभीर जखमी झाले. ही घटना सावनेर तालुक्यातील सर्रा (नागलवाडी) शिवारात गुरुवारी (दि. ३) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
कपिल वऱ्हाडपांडे (४०, रा. सर्रा, ता. सावनेर) यांची सर्रा (नागरवाडी) शिवारात शेती आहे. काही मजूर शेतात काम करीत हाेते तर त्यांची गुरे शेतातच चरत हाेती. दरम्यान, दुपारच्या सुमारास वादळासह हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यातच जाेरात कडाडलेली वीज गाय व वासरू असलेल्या परिसरात काेसळली. यात हाेरपळल्याने गंभीर जखमी झालेल्या गाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वासरू गंभीर जखमी झाले. कपिल वऱ्हाडपांडे यांनी या घटनेची माहिती खापा पाेलिसांना दिली. या गाईची किंमत ५० हजार रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट काेसळल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.