भाकपची आंबेडकर जयंतीपासून ‘भाजप हटाव, देश बचाओ’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 08:02 PM2023-04-10T20:02:57+5:302023-04-10T20:04:06+5:30
Nagpur News शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार, महिला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ‘भाजप हटाव, देश बचाओ’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम आखण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.
नागपूर : देशात ९ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपप्रणीत मोदी सरकारच्या धोरण व कार्यपद्धतीमुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी आणि विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार, महिला, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ‘भाजप हटाव, देश बचाओ’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम आखण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.
भाकपची जिल्हा कौन्सिल बैठक कॉ. नत्थु परतेती यांच्या अध्यक्षतेखाली स॑पन्न झाली. जिल्हा सचिव कॉ. अरुण वनकर यांनी नागपूर जिल्ह्याचा कार्यक्रम सादर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पदयात्रा प्रारंभ होईल. शहरात १८ एप्रिलपर्यंत पदयात्रा होईल व जगजागृती करणारी पत्रके वितरित केली जातील. १९ एप्रिल ते १५ मे पर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये जाऊन गाव सभा घेतल्या जातील.
बैठकीला डॉ. युगल रायलू, संजय राऊत, करुणा साखरे, अजय साहू, गजानन घोडे, जयश्री चहा॑दे, सुखदेव हेडाऊ, रवींद्र पराते, श्याम निखारे, दुर्योधन मसराम, संजय धुर्वे, सुनील शे॑डे, प्रगती खापर्डे, गंगाराम खेडकर, राजूभाऊ वाडिभस्मे, शरद पि॑पळे, अनिल हजारे आदी उपस्थित होते.