उकेंमुळे फसलेल्या वकिलांना उत्तरासाठी अंतिम संधी

By admin | Published: April 27, 2017 01:58 AM2017-04-27T01:58:09+5:302017-04-27T01:58:09+5:30

न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात शिक्षा झालेले वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यासाठी अवैधपणे कार्य करणारे

Cracked advocates have the ultimate opportunity to answer the excuse | उकेंमुळे फसलेल्या वकिलांना उत्तरासाठी अंतिम संधी

उकेंमुळे फसलेल्या वकिलांना उत्तरासाठी अंतिम संधी

Next

हायकोर्ट : कारणे दाखवा नोटीसला दिला नाही प्रतिसाद
नागपूर : न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात शिक्षा झालेले वादग्रस्त वकील सतीश उके यांच्यासाठी अवैधपणे कार्य करणारे अ‍ॅड. आर. एस. काकड व अ‍ॅड. व्ही. डी. जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन दोघांनाही बाजू स्पष्ट करण्यासाठी अंतिम संधी म्हणून २ मेपर्यंत वेळ दिला.
न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाली. काकड हे मुंबईत नोटरी आहेत. उके यांनी व्यक्तिश: बाहेर न येता परस्पर सूत्रे हलवून न्यायालयामध्ये विविध कारणांसाठी दोन अर्ज दाखल केले होते. हे अर्ज काकड यांनी नोंदणीकृत केले होते. त्यापैकी एका अर्जातील पहिल्याच परिच्छेदात उके यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा उल्लेख होता. त्यामुळे उके हे न्यायालयाला सहकार्य करीत आहेत किंवा नाही, याची पूर्ण शहानिशा करूनच काकड यांनी अर्ज नोंदणीकृत करणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. परिणामी न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नोटरीचा परवाना रद्द करण्याचा आदेश का देण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे.
दुसरे वकील जगताप यांनी स्वत:च्या स्वाक्षरीचा वकालतनामा न जोडता उके यांचे दोन अर्ज न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयाने जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी त्यांच्या बेकायदेशीर कृतीची माहिती महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलला का कळविण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. दोन्ही वकिलांना न्यायालयाची नोटीस तामील करण्यात आली आहे. असे असतानाही त्यांनी स्वत: किंवा अन्य वकिलामार्फत न्यायालयात उपस्थिती दर्शविली नाही. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उके यांना दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)

वॉरंट तामील करा
दुसऱ्या अवमानना प्रकरणात उके यांना येत्या ८ जूनपर्यंत जामीनपात्र वॉरंट तामील करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिसांना उकेंना शोधण्यात अपयश आले आहे.

Web Title: Cracked advocates have the ultimate opportunity to answer the excuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.