‘सृष्टी’ला सृष्टीने घडविले अन् लोकमतने दिली ओळख

By admin | Published: May 13, 2015 02:31 AM2015-05-13T02:31:18+5:302015-05-13T02:31:18+5:30

सृष्टी आहे तशी लहानच अवघ्या १० वर्षांची. परंतु ज्या करामती ती करते त्या तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असणाऱ्यांनाही जमणार नाही.

Creation was created by nature and Lokmat gave it a recognition | ‘सृष्टी’ला सृष्टीने घडविले अन् लोकमतने दिली ओळख

‘सृष्टी’ला सृष्टीने घडविले अन् लोकमतने दिली ओळख

Next

नागपूर : सृष्टी आहे तशी लहानच अवघ्या १० वर्षांची. परंतु ज्या करामती ती करते त्या तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असणाऱ्यांनाही जमणार नाही. पाहणाऱ्या प्रत्येकाला ती थक्क करून सोडते. याच कौशल्याच्या बळावर आपण एक दिवस स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू, असे तिला वाटायचे. तिच्या या संकल्पाला वास्तवात उतरविण्यासाठी तिचे वडील धर्मेंद्र शर्मा यांनीही खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या हाती निराशाच लागली. ना कुठे ओळख होती ना हातात पैसा. अशा निराश स्थितीत त्यांचा लोकमतशी संपर्क आला आणि एक आशेचा किरण त्यांना दिसायला लागला.
लोकमत एक असे दैनिक आहे जे व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकीही सदैव जपत असते. त्यातही विषय मुलींच्या प्रगतीचा असेल तर लोकमत स्वत:हून पुढाकार घेत असते. याच सामाजिक भावनेतून लोकमत दीर्घकाळापासून ‘मुलगी वाचवा अभियान’ राबवत आहे. सृष्टीच्या बाबतीतही लोकमतने पुढाकार घेतला व तिच्या प्रतिभेला जगासमोर आणण्याचा विडा उचलला. सृष्टीने विक्रम करावा यासाठी २३ आॅगस्ट २०१४ ला माहेश्वरी भवनात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हजारो नागपूरकर या विक्रमाचे साक्षीदार ठरले. (प्रतिनिधी)

Web Title: Creation was created by nature and Lokmat gave it a recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.