मेट्रिक्सच्या संचालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Published: July 19, 2015 03:04 AM2015-07-19T03:04:13+5:302015-07-19T03:04:13+5:30

कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा संचालक सुचित कुमार रामटेके ...

Crime against 12 people with Metrics director | मेट्रिक्सच्या संचालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हे

मेट्रिक्सच्या संचालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हे

Next

अनेकांची फसवणूक : कोट्यवधी हडपले
नागपूर : कमी किमतीत फ्लॅट देण्याची बतावणी करून शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या मेट्रिक्स इन्फ्रा कंपनीचा संचालक सुचित कुमार रामटेके आणि त्याच्या ११ साथीदारांवर धंतोली पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
रामटेकेने वानाडोंगरी परिसरात रॉयल रेसिडेन्सी ही बहुमजली फ्लॅट स्कीम उभारण्याची पाच वर्षांपूर्वी जाहिरातबाजी केली होती. अल्प किमतीत स्वप्नातील घर मिळत असल्याचे सांगितले गेल्यामुळे रामटेके आणि त्याच्या साथीदारांच्या आमिषाला शेकडो नागरिक बळी पडले. कुणी तीन लाख तर कुणी त्यापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडे अ‍ॅडव्हान्स म्हणून दिली. आता पाच वर्षे झाली. मात्र, रामटेकेने दाखविलेल्या जागेवर केवळ खड्डेच दिसत आहेत. प्रत्येक वेळी तो वेगळे कारण सांगून फ्लॅट बुक करणारांना आल्यापावली परत पाठवित होता. मात्र, त्याची बनवाबनवी उघड झाल्यामुळे अनेक जण एकत्र आले. त्यांनी पोलिसांना रामटेकेच्या फसवणुकीची माहिती दिली. चौकशीच्या नावाखाली अनेक दिवस पोलिसांनी त्यांना टोलविले. परंतु, शनिवारी नागरिकांनी धंतोली ठाण्यासमोर गर्दी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. ठाणेदार राजन माने यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावतीने कैलास पाटील यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. सुचित रामटेके, सुधाकर सोनपिंपळे, अमित राव, विजय वर्मा, गुणवंत गिरडकर, संजय चहांदे, अविनाश बारसागडे, महेश बावणे, शिल्पा इंगळे, राजेंद्र भागवत, सुमित अग्रवाल, अपेक्षा मेश्राम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against 12 people with Metrics director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.