गुन्हे शाखेतर्फे गरजू मुलींना भेटवस्तू वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:07 AM2021-06-10T04:07:18+5:302021-06-10T04:07:18+5:30
नागपूर : गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पोलीस विभागात ४० वर्षांपासून कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप शर्मा ...
नागपूर : गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी पोलीस विभागात ४० वर्षांपासून कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप शर्मा यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी अजनी की टाेली वस्तीमधील गरजू मुलींना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू वितरित करण्यात आल्या. हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
शर्मा १९८२ मध्ये पोलीस विभागात नियुक्ती झाल्यानंतर पाच वर्षे पारशिवनी येथे सेवारत होते. त्यानंतर त्यांनी एसीबी व शहर पोलीस विभागात सेवा दिली. पुढे त्यांना गुन्हे शाखेच्या वाचक विभागात गुन्हे सांख्यिकीचे काम सोपविण्यात आले. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. कोरोनापीडित नागरिकांना भोजन पुरवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांना डीजी मेडल, पोलीस पदक आणि २६५ विविध पुरस्कार व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. ते या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. करिता, त्यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच, त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.