नागपुरातील राज डोरलेच्या हत्याकांडाचा तपास गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 08:27 PM2020-06-10T20:27:00+5:302020-06-10T20:28:45+5:30
भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचा पदाधिकारी राज डोरले याच्या हत्याकांडाचा तपास आता गुन्हेशाखेला सोपविला आहे. राजच्या हत्येचा स्वतंत्र व निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहे. गुन्हेशाखेने राजच्या हत्येचा सूत्रधार आशिष वाजूरकरसह पाच आरोपीेंना ताब्यात घेतले आहे. ते १२ जूनपर्यंत कोठडीत आहे.
१ जूनच्या रात्री महाल परिसरातील भूतेश्वरनगर येथे २८ वर्षीय राज डोरले याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मुकेश नारनवरे व अंकित चतूरकर या आरोपींना अटक केली होती. अटकेतील आरोपी मुकेशने सांगितले की राज त्याच्यावर हल्ला करणार होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. त्याने या हत्याकांडात इतर कुणाचाही हात नसल्याचे सांगितले. लोकमतने या प्रकरणात सुपारी देऊन हत्या केल्याचा खुलासा केला होता. पोलिसांनी वृत्ताची दखल घेत, चौकशी करून आशिष वाजूरकर याच्याकडून हत्येची सुपारी दिल्याचा खुलासा केला. पोलिसांनी आशिषसोबत त्याचा मित्र रुपेश मेश्राम व आकाश मेश्राम यालाही अटक केली. राजकीय विरोधासोबतच पैशासाठी राजची हत्या केल्याची चर्चाही होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास गुन्हेशाखेच्या युनिट ३ ला सोपविण्यात आला. गुन्हेशाखेचे अधिकारी विनोद चौधरी यांनी मंगळवारी आरोपींना ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
सूत्रांच्या मते राज सट्टेबाजी करीत होता. तो सामाजिक कार्यातही लाखो रुपये खर्च करीत होता. राज महापालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत होता. हत्येचा सूत्रधार आशिषसुद्धा राजकारणात सक्रिय आहे. त्याला राज विरोधक भासत होता. राजचेसुद्धा काही लोकांवर २ कोटी रुपये थकीत होते. राजकडून वारंवार मागणी होत असल्याने ते चिंतेत होते. आशिषचे म्हणणे आहे की तो राजच्या टार्गेटवर होता. त्याला अनेकांने सांगितले होते. त्याच कारणाने त्याची हत्या करण्यात आली. सूत्रांच्या मते राजकीय वाद व पैशाच्या वादातून हत्या केली जाऊ शकते. त्यामुळे आशिषने योजना आखून त्याची हत्या केली. राजच्या हत्येमुळे भाजप नेत्यांमध्ये सुद्धा खळबळ माजली आहे. त्यांना राजच्या हत्येमागे मोठा कट दिसून येत आहे. मात्र गुन्हेशाखेच्या चौकशीत आशिषने राजकीय वाद अथवा पैशाच्या वादामुळे हत्या केली नसल्याचे सांगितले आहे.