नागपुरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा : भाजप नगरसेवकासह ८ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:08 PM2020-06-17T21:08:09+5:302020-06-17T21:12:24+5:30

भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकासोबत ८ जुगाऱ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर, अत्रे ले-आऊट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने धाड टाकली. आरोपींकडून १९ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Crime Branch raids gambling den in Nagpur: 8 arrested with BJP corporator | नागपुरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा : भाजप नगरसेवकासह ८ अटकेत

नागपुरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा : भाजप नगरसेवकासह ८ अटकेत

Next
ठळक मुद्दे२० लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकासोबत ८ जुगाऱ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर, अत्रे ले-आऊट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने धाड टाकली. आरोपींकडून १९ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतलल्या भाजप नगरसेवकाचे नाव प्रवीण विलासराव भिसीकर (४०, रा. तीन नल चौक, कसारपुरा) असून ते प्रभाग क्रमांक ५ (ब) चे नगरसेवक आहेत. हा जुगार अड्डा अत्रे ले-आऊट एनआयटी गार्डनजवळील संजय लाटकर याच्या घरी सुरू होता. यासंदर्भात गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात ८ आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. आरोपींमध्ये संजय भाऊराव कुराडे (५४, रा. मंगलधाम सोसायटी, टाकळी सिम), नरेंद्र व्यंकटराव मेश्राम (४६, रा. ८५ प्लॉट, जोगीनगर), प्रवीण मनोहर पराते (३३, रा. विणकर कॉलनी, मानेवाडा रोड), सुरेश महादेवराव भोयर (५४, रा. धोटे ले-आऊट), नीलेश केशवराव मोहाडीकर (३४, रा. विणकर कॉलनी), रमेश रूपलाल जाधव (५४, रा. एच.बी. इस्टेट, सोनेगाव), ज्ञानेश्वर नत्थूजी धार्मिक (४२, रा. साईनगर, जयताळा) यांचा समावेश आहे. आरोपींकडून रोख १०२०० रुपये, ७ मोबाईल फोन, ३ चारचाकी व २ दुचाकी असा १९ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सह पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पंकज धाडगे, रफीक खान, प्रशांत लाडे, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, श्याम कडू, अमित पात्रे, प्रवीण गोरटे, मो. शारीफ, राजू पोतदार यांचा समावेश होता.

Web Title: Crime Branch raids gambling den in Nagpur: 8 arrested with BJP corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.