गुन्हे शाखेच्या पथकाची जी. एस. कॉलेजमध्ये चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:29 PM2018-08-24T22:29:07+5:302018-08-24T22:29:48+5:30
राहुल तिवारी मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी जीएस कॉलेजमध्ये पोहचले. पोलिसांनी कॉलेजच्या प्राचार्य आणि शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांकडे तब्बल तीन तास विचारपूस केल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राहुल तिवारी मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी जीएस कॉलेजमध्ये पोहचले. पोलिसांनी कॉलेजच्या प्राचार्य आणि शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांकडे तब्बल तीन तास विचारपूस केल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी राहुल रामाधरण तिवारी (वय १६) याचा २ आॅगस्टला दुपारी एका विद्यार्थ्यासोबत वाद झाला. हाणामारीनंतर दुसºया विद्यार्थ्याने धक्का दिल्याने वरून खाली पडून राहुल गंभीर जखमी झाला. त्याला खासगी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना दाबून ठेवण्यासाठी कॉलेज प्रशासनाने बरेच प्रयत्न केले. मात्र, ती उघड झाल्यामुळे दुसºया दिवशी ३ आॅगस्टला संतप्त आप्तस्वकियांनी राहुलचा मृतदेहासह सीताबर्डी पोलीस ठाणे आणि कॉलेजमध्ये जोरदार निदर्शने केली. यावेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राहुलला मारहाण झाल्याचे सांगितले. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणात कॉलेज प्रशासन सुरुवातीपासूनच लपवाछपवी करून संशयास्पद भूमिका वठवित आहे. प्रारंभी राहुलचा मृत्यू आजारामुळे झाल्याची बतावणी केली. त्यामुळे पोलिसांची भूमिकाही औपचारिक राहिली. राहुलच्या नातेवाईकांनी मागणी केल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणाचा तपास सीताबर्डी ठाण्याकडून काढून गुन्हे शाखेला सोपविला. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास जी. एस. कॉलेजमध्ये पोहचले. त्यांनी प्रा. डॉ. एन. वाय. खंडाईत यांच्याकडून प्रकरणाचा अहवाल घेतला. या घटनेनंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या बयानाचीही माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यांचे बयाण नोंदविण्यासाठी पोलिसांचे पथक पुन्हा कॉलेजमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या घडामोडीमुळे शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.