नागपुरात गुन्हेगारी वाढली - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:43 PM2017-12-18T23:43:18+5:302017-12-18T23:44:48+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरचे आहेत. ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे, असे असतानाही नागपुरात सातत्याने गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: नागपूरचे आहेत. ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे, असे असतानाही नागपुरात सातत्याने गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केली.
अजित पवार म्हणाले, नागपुरात सातत्याने खून, चोऱ्या होत आहे. कधी कुणाचा जीव जाईल सांगता येत नाही. काल परवाच गोळीबार झाला. नागपुरात अस्वस्थ वातावरण आहे. गृहमंत्री नागपूरचे असूनही गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. हे पोलिसांचे आणि सरकारचे अपयश आहे.
दरम्यान विनोद तावडे यांनी नागपुरात क्राईम रेट कमी झाल्याचे सांगितले. तेव्हा अजित पवार यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशातील गुन्हेगारी वाढलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केल्याचे स्पष्ट करीत त्या यादीत पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्हे असून त्यात नागपूरचा समवेश असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात त्यांनी स्थगन प्रस्ताव सादर केला होता. परंतु तो फेटाळण्यात आला. यासंदर्भात शासनाने लक्ष घालावे, असे अध्यक्षांनी सरकारला सूचित केले.