क्राईम न्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:16+5:302021-08-28T04:13:16+5:30
नागपूर : बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन युवकाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केले. जखमी झालेल्या युवकाचे नाव शैलेंद्र ...
नागपूर : बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीन युवकाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केले. जखमी झालेल्या युवकाचे नाव शैलेंद्र सरपा आहे. शैलेंद्र गुरुवारी रात्री धंतोलीतील जिमखाना मैदानावर बसला होता. त्यावेळी १७ वर्षीय अल्पवयीन युवक तिथे आला. शैलेंद्रने त्याला बसण्यास मनाई केली. त्यामुळे तो संतप्त झाला. सिमेंटची कुंडी फेकून शैलेंद्रला जखमी केले. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
- आरोपींकडून पाच लाख रुपये हप्त्याची मागणी
नागपूर : पाच लाख रुपये हप्ता मागणाऱ्या आरोपींविरुद्ध यशोधरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव नूर आलम, सलमान अन्सारी, सुलतान अन्सारी तसेच शेख सलाम ऊर्फ पम्या आहे. नूर आलम हा कुख्यात आरोपी आहे. एक वर्षापूर्वी तो तडीपार होता. २५ ऑगस्टला नूर आलम हा समीर याच्याकडे आला. त्याला पाच लाख रुपयाची मागणी करू लागला. पैसे नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.
समीरच्या तक्रारीवर पोलिसांनी हप्ता वसुली तसेच धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
---
विवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल
नागपूर : नंदनवन पोलिसांनी विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तीन नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. ललिता वाघमारे(३० रा. सहकारनगर)ने २४ जून रोजी गळफास लावला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून चौकशी केली. चौकशीत पती आशिष वाघमारे, भाऊ अमोल वाघमारे, वहिनी सुषमा वाघमारे यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे निदर्शनास आले. त्याआधारे पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
- १८ लाखाच्या साहित्याची चोरी
नागपूर : अपघातग्रस्त कंटेनरमधून १८.५३ लाख रुपयाचे साहित्य चोरल्याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. २० ऑगस्ट रोजी पहाटे कंटेनर घेऊन बंगलोर जात होता. पांजरी टोलनाक्याजवळ कंटेनर उलटला. कंटनेरमध्ये असलेले सामान रस्त्यावर पडले. अज्ञात आरोपी हे १८.५३ लाख रुपयाचे साहित्य चोरून फरार झाले. बेलतरोडी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.