लाचखोर भूमी अभिलेख उपअधीक्षक जाळ्यात

By admin | Published: May 25, 2016 02:53 AM2016-05-25T02:53:25+5:302016-05-25T02:53:25+5:30

वडिलोपार्जित शेतीची वाटणी करून मोजणी करण्यासाठी आधी ७००० रुपये घेऊनही मोजणी करून न देणाऱ्या भिवापूर येथील ...

Criminal Land Record Dy | लाचखोर भूमी अभिलेख उपअधीक्षक जाळ्यात

लाचखोर भूमी अभिलेख उपअधीक्षक जाळ्यात

Next

‘एसीबी’ची कारवाई : ७०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडले
भिवापूर : वडिलोपार्जित शेतीची वाटणी करून मोजणी करण्यासाठी आधी ७००० रुपये घेऊनही मोजणी करून न देणाऱ्या भिवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी उपअधीक्षकास ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई भिवापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुनील नीळकंठ श्रीखंडे (३८) असे अटक करण्यात आलेल्या प्रभारी उपअधीक्षकाचे नाव आहे. फिर्यादी नंदकिशोर वसंतराव देवतळे, रा. लोणारा, ता. भिवापूर यांची लोणारा शिवारात १७ एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीची भावांमध्ये वाटणी करावयची असल्याने त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात या शेताच्या मोजणीसाठी १२ फेब्रुवारी २०१६ रोजी अर्ज केला. सदर मोजणीसाठी प्रभारी उपअधीक्षक सुनील श्रीखंडे याने त्यांना ७००० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम मिळाल्यानंतर श्रीखंडे याने १६ फेब्रुवारीला मोजणीबाबत नोटीस काढला व २१ एप्रिल ही मोजणीची तारीख ठरविण्यात आली. ठरलेल्या दिवशी देवतळे कुटुंबीय शेतात हजर होते. मोजणी करण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे देवतळे यांनी २ मे रोजी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावर श्रीखंडे याने त्यांना पुन्हा २००० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही श्रीखंडे त्रास देत असल्याने देवतळे यांनी २० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. ठरल्याप्रमाणे एसीबीचे पथक मंगळवारी दुपारी भिवापुरात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास दोन पंचासमक्ष देवतळे यांनी श्रीखंडे याला त्याच्या कक्षात ७०० रुपये दिले. त्यातच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, भानुदास गीते, प्रभाकर बल्की, मिश्रा यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

१३ हजार ५३० रुपये आढळले
सुनील श्रीखंडे याने अनेकांकडून पैसे वसून करीत मोठी माया जमविल्याची माहिती जाणकारांनी दिली. कारवाईदरम्यान, पथकातील सदस्यांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या २५ नोटा, १०० रुपयांच्या ९ नोटा, ५० रुपयांच्या २ नोटा, १० रुपयांच्या ३ नोटा असे एकूण १३ हजार ५३० रूपये आढळले. पथकाने ही रक्कम लिफाफ्यात बंद करून पुरावा म्हणून ताब्यात घेतली.

Web Title: Criminal Land Record Dy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.