सर जो उठेगा धड से कटेगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:48 PM2020-05-12T12:48:19+5:302020-05-12T12:48:41+5:30

हिंदी चित्रपट ‘रक्तचरित्र’मधील ‘सर जो उठेगा धड से कटेगा, गांव से छिपेगा कहाँ से बचेगा’ या गाण्याला शहरातील एका गुन्हेगाराने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले आहे. अनेक लोक त्याच्या दहशतीत आहेत आणि बळीही ठरले आहेत.

Criminal in Nagpur arrested | सर जो उठेगा धड से कटेगा...

सर जो उठेगा धड से कटेगा...

Next

जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी चित्रपट ‘रक्तचरित्र’मधील ‘सर जो उठेगा धड से कटेगा, गांव से छिपेगा कहाँ से बचेगा’ या गाण्याला शहरातील एका गुन्हेगाराने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले आहे. अनेक लोक त्याच्या दहशतीत आहेत आणि बळीही ठरले आहेत. प्रतिष्ठेपोटी पीडित नागरिक पुढे आले नाही आणि जे समोर आले त्यांनाही शांत केले गेले. परंतु, पोलिसांच्या गुन्हे शाखेची वक्रदृष्टी पडताच त्या गुन्हेगाराचा काळ वक्री झाला असून, तो कुख्यात गुन्हेगार रोशन शेख तुरुंगात बंद झाला आहे.
दुकानावर कब्जा करण्यासाठी अपहरण करून जिवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणात क्राईम ब्रँचने रोशन शेखला अटक केली आहे. या प्रकरणात कुख्यात अंकित पाली, अभिषेक सिंहसोबतच सात आरोपी सामील आहेत. या गँगच्या दुष्कृत्याला बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. पीडितांची क्लिपिंग बनवून ती व्हायरल करायची. त्यामुळे, पीडित घाबरून त्यांच्या हातचे खेळणे बनतो. अशा प्रकारच्या अनेक क्लिपिंग पुढे आल्या आहेत. या क्लिपिंगमध्ये संबंधित गुन्हेगार महिलांसोबत अय्याशी करण्यासोबतच, त्यांना बाधा पोहोचवणाऱ्यांची धुलाई करतानाचे चित्रिकरण आहे. एका क्लिपिंगमध्ये तर कायदा धाब्यावर बसवून गुन्हेगार पिस्तुल हातात घेऊन कार चालवत आहे. ‘रक्तचरित्र’मधील गाण्यावर ही क्लिपिंग बनविण्यात आली आहे. या क्लिपिंगची दखल घेण्याची भीती असल्यामुळे ती पिस्तुल नसून लायटर असल्याचेही सांगितले जात आहे.

खरे सांगायचे तर क्लिपिंग बनवून व्हायरल करण्याची ही नीती प्लॅनिंगचाच एक भाग आहे. याच धर्तीवर कुख्यात संतोष आंबेकर काम करत होता. आंबेकर स्वस्त सोने किंवा जमीन मिळवून देण्याचा तसेच नोट एक्सचेंज रॅकेट चालवत होता. पीडित व्यक्तीला आंबेकर स्वत:च्या गुन्हेगारीची माहिती देणाºया युट्यूब व सोशल मीडियावरील बातम्या दाखवून पीडिताला धमकावत असे. याच दहशतीमुळे आंबेकर विरोधात पोलिसात तक्रार करण्यास कुणी धजावत नव्हता. याच प्रकारे रोशन शेखही काम करत होता.

गुन्हेगारांची कंबर मोडू - सीपी
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लॉकडाऊनची जबाबदारी निभावतानाच गुन्हेगारांची कंबर मोडण्याचे काम पोलीस करत असल्याचे सांगितले. गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. पीडित महिला पुढे आल्यास त्याना संरक्षण दिले जाईल आणि त्यांची ओळखही लपवून ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Criminal in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.