गुन्हेगारांवर वचक बसेल

By admin | Published: January 8, 2015 01:22 AM2015-01-08T01:22:54+5:302015-01-08T01:22:54+5:30

कामठी शहर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून गणल्या जाते. हा परिसर संवेदनशील बनला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जुनी कामठी पोलीस ठाण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील

The criminals are amazed | गुन्हेगारांवर वचक बसेल

गुन्हेगारांवर वचक बसेल

Next

मुख्यमंत्री : जुनी कामठी पोलीस ठाण्याचे उद्घाटन
कामठी : कामठी शहर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून गणल्या जाते. हा परिसर संवेदनशील बनला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जुनी कामठी पोलीस ठाण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण थोडा कमी होईल. शिवाय, या परिसरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासनाने नव्यानेच मंजूर केलेल्या तसेच सर्व सुविधा व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीने सज्ज जुनी कामठी पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. नाना पटोले, आ. डी. एम. रेड्डी, आ. बाळा काशीकर, आ. प्रा. अनिल सोले, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, नगर परिषद उपाध्यक्ष रणजित सफेलकर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल वंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, नवनाथ ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी पोलीस ठाण्यातील दैनंदिन डायरीमध्ये नोंद केली. संचालन ठाणेदार सतीश गोवेकर यांनी केले तर, आभार अरविंद मालवीय यांनी मानले. यावेळी अजय कदम, प्रमोद कामळे,अजय अग्रवाल, नियाज कुरेशी यांच्यासह पोलीस कर्मचारी सर्वश्री प्रदीप गुजर, अशोक वासनिक, अजय हिरेखान, भोजराज बांते, देवीदास बागळे, रमेश चहारे, माधुरी हातमोडे, श्याम जोशी, अण्णा दशमवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The criminals are amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.