गुन्हेगारांचा शहरात दीड तास धुमाकूळ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:01+5:302021-07-15T04:08:01+5:30

नागपूर : लाठ्याकाठ्या, लाेखंडी राॅड व हत्यारांसह असलेल्या गुन्हेगारांनी मंगळवारी रात्री शहरात दीड तास धुमाकूळ घातला. त्यांचा हा धुडगूस ...

Criminals roam the city for an hour and a half | गुन्हेगारांचा शहरात दीड तास धुमाकूळ ()

गुन्हेगारांचा शहरात दीड तास धुमाकूळ ()

Next

नागपूर : लाठ्याकाठ्या, लाेखंडी राॅड व हत्यारांसह असलेल्या गुन्हेगारांनी मंगळवारी रात्री शहरात दीड तास धुमाकूळ घातला. त्यांचा हा धुडगूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शहरात कडेकाेट सुरक्षा बंदाेबस्त असल्याच्या पाेलिसांच्या दाव्याची सत्यता उघड झाली आहे.

माहितीनुसार रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान १२ ते १५ माेटरसायकलवर स्वार असलेल्या असामाजिक तत्वांनी शांतिनगरकडे कूच केले. बहुतेक तरुणांजवळ लाठ्या व राॅड हाेते तर काहींनी तलवारीही लपविल्याचे सांगण्यात येत आहे. शांतिनगरमधून निघून दहीबाजाराकडे हे तरुण पाेहचले. पुढे मारवाडी चाैक, बंगाली पंजा परिसरात धुमाकूळ घातला. वेगाने बाईक चालविणारे हे तरुण कुणालातरी शाेधत हाेते. प्रकाश पानटपरीजवळ पाेलीस उभे असल्याचे पाहून ते वेगवेगळ्या दिशेने वळले व पुढे वळण घेत राऊत चाैकात पाेहचले. येथून मस्कासाथ आणि दहीबाजार पुलाकडून ते पुन्हा शांतिनगरकडे परत आले.

यादरम्यान घटनेची माहिती लक्षात येताच पाेलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. हे तरुण पाचपावली येथील शुभम नामक युवकावर हल्ला करण्याच्या उद्देशाने धुमाकूळ घालत असल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. पाेलिसांनी त्या भागात जाऊन चाैकशी केली असता हे तरुण येऊन गेल्याची माहिती मिळाली. दीड तास चाललेला हा धुडगूस पाहून पाेलिसांचीही दमछाक झाली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून या असामाजिक तत्वांचा शाेध घेतला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे शहरात लाॅकडाऊन सुरू असून पाेलीस रस्त्यावर तैनात आहेत. असे असताना असामाजिक तत्वांचा हा धुडगूस चिंता वाढविणारा ठरला आहे. हे सर्व तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या आधारावर पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. मात्र हे प्रकरण संवेदनशील ठरणारे आहे.

Web Title: Criminals roam the city for an hour and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.