नागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:38 AM2018-05-27T01:38:26+5:302018-05-27T01:38:41+5:30

दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून चौघांनी एका गुन्हेगार तरुणाची हत्या केली. गोवर्धन शालिकराम शेंडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयशनगरात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

Criminals stabbed and murdered in the municipality of Nagpur | नागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

नागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

Next
ठळक मुद्देतणाव : हुडकेश्वर पोलीस घेत आहेत आरोपींचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवून चौघांनी एका गुन्हेगार तरुणाची हत्या केली. गोवर्धन शालिकराम शेंडे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयशनगरात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली.
नरसाळा येथील श्रेयशनगरात शेंडे राहत होता. त्याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्याने काही वर्षांपूर्वी एकाची हत्या केली होती. १५ जानेवारी २०१८ ला तो कारागृहातून बाहेर आला. सध्या तो वडिलांसोबत भाजी विकत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री हे दोघे बापलेक घराच्या बाजूलाच दारू पीत बसले. त्यांनी त्यांच्या घरात लाईनवर आकडा टाकून विजेची अवैध जोडणी केली होती.
शुक्रवारी रात्री ९.४५ ला कुणीतरी अचानक वायर ओढल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शेंडेने खांबाजवळ जाऊन पाहणी केली. अंधारात काही जण दिसल्याने त्याने त्यांना शिवीगाळ केली. घरात चाकू आणासाठीही निघाला. ते पाहून आरोपी कांगारू आणि त्याच्या तीन साथीदारांनी शेंडेला घेरले आणि लोखंडी रॉड तसेच काठ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी त्याला दगडाने ठेचले. हत्येच्या या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी धावले. चौकशीनंतर शालिकराम तुकाराम शेंडे (वय ५७) या यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Criminals stabbed and murdered in the municipality of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.