कोविड रुग्णालयात गुन्हेगारांनी केली तोडफोड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:20+5:302021-05-17T04:08:20+5:30

नागपूर : इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धमकावले. रविवारी सायंकाळी घडलेल्या या ...

Criminals vandalize Kovid hospital () | कोविड रुग्णालयात गुन्हेगारांनी केली तोडफोड ()

कोविड रुग्णालयात गुन्हेगारांनी केली तोडफोड ()

Next

नागपूर : इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धमकावले. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. इमामवाडा पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.

इमामवाडा येथील मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयात कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र सुरू आहे. सायंकाळी ६.३० वाजता बोरकरनगर, बारा सिग्नल येथील गुन्हेगार बादल पसेरकर, रिकी तोमस्कर, डेव्हीड अडबिडया आणि ललीत बुलेट हे एक्टीव्हाने आयसोलेशन रुग्णालयात पोहोचले. यापैकी एकाने जखम झाल्याचे सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बँडेज करण्यास सांगितले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हे सध्या कोविड केअर सेंटर असल्याने मेडिकलला जाण्यास सांगितले. यामुळे गुन्हेगारांना राग आला. ते शिवीगाळ करीत कर्मचाऱ्यांना धमकावू लागले. त्यांनी रुग्णालयात ठेवलेली खुर्ची आणि डस्टबीनची तोडफोड केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने कर्मचारी घाबरले. रुग्णालयाजवळच इमामवाडा पोलीस ठाणे आहे. घटनेची माहिती होताच पोलीस पोहोचले. त्यांना पाहून आरोपी फरार झाले. त्यांच्या दाेन साथीदारांना पोलिसांनी पकडले. नंतर फरार झालेले आरोपीही ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार आराेपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Criminals vandalize Kovid hospital ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.