संकट टेळेना, २२ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:59+5:302021-04-14T04:08:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कळमेश्वर/काटाेल/रामटेक/उमरेड/हिंगणा/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. तेरा तालुक्यात मंगळवारी २२ रुग्णांचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/कळमेश्वर/काटाेल/रामटेक/उमरेड/हिंगणा/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने कहर केला आहे. तेरा तालुक्यात मंगळवारी २२ रुग्णांचा मृत्यू झाला तर २१४४ रुग्णांची आणखी भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १३०१ रुग्णांचा कोरोना मृत्यू झाला आहे तर ६९,६३३ जण बाधित झाले आहे. मंगळवारी ग्रामीण भागात १ हजार रुग्ण बरे झाले. सर्वाधिक ३२३ रुग्ण सावनेर तालुक्यात आढळून आले. कळमेश्वर तालुक्यात २६७, काटाेल तालुक्यात १६५, रामटेकमध्ये १३६, उमरेड तालुक्यात ८७, हिंगण्यात ५३, तर कुही तालुक्यात १९ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली.
सावनेर तालुक्यात संक्रमणाचा वेग कायम आहे. तालुक्यात मंगळवारी ३२३ रुग्णांची भर पडली असून, यात १०७ रुग्ण सावनेर शहरातील, तर २१६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. कळमेश्वर तालुक्यातही २६७ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर ब्राम्हणी शहरातील ३९, तर ग्रामीण भागातील २२८ रुग्ण आहेत. या २२८ रुग्णांमध्ये मोहपा शहरातील २२, बोरगाव येथील १९, पिपळा १८, खुमारी १३, बोरगाव (खु) १२, कन्हाडोल व म्हसेपठार येथील प्रत्येकी ९, वरोडा व पिल्कापार येथील प्रत्येकी ८, कोहळी व गोंडखैरी येथील प्रत्येकी ७, वाढोणा (बु), तोंडाखैरी, लोहगड व मांडवी येथील प्रत्येकी ६, धापेवाडा, सोनपूर व भंडागी येथील प्रत्येकी ५, झुनकी, तेलकामठी, पारडी (देशमुख), कोकर्डा व तिष्टी (बु) येथील प्रत्येकी ४, देवबर्डी, सुसंद्री, वाढोणा व परसोडी येथील प्रत्येकी ३, निमजी, लिंगा, मोहगाव, नांदिखेडा, उपरवाही, बेल्लोरी व तिष्टी (खु) येथील प्रत्येकी २, आदासा, सावळी (बु), खैरी (लखमा), तिडंगी, सोनुली व तेलगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण पाॅझिटिव्ह आहे.
काटाेल तालुक्यात मंगळवारी ६५१ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, यातील १६५ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात काटोल शहरातील ७९ व ग्रामीण भागातील ८६ रुग्ण आहेत.