अजनीवनानंतर नीरीच्या वनसंपदेवरही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:12+5:302021-01-25T04:09:12+5:30

नागपूर : इंटर मॉडेल स्टेशन (आयएमएस) साठी ५५ एकरमधील अजनीवनात होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी संघटना व सामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध ...

Crisis on Neeri forest resources after Ajniwana | अजनीवनानंतर नीरीच्या वनसंपदेवरही संकट

अजनीवनानंतर नीरीच्या वनसंपदेवरही संकट

Next

नागपूर : इंटर मॉडेल स्टेशन (आयएमएस) साठी ५५ एकरमधील अजनीवनात होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी संघटना व सामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध हाेत आहे. असे असताना अजनीनंतर आता नीरीच्या वनसंपदेचा आयएमएस प्रकल्पासाठी बळी जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयएमएस प्रकल्प व वर्धा रोडच्या इंटरचेंजसाठी नीरीची जवळपास दोन एकर जागा मागण्यात आली आहे. एवढेच नाही तर जेल परिसरातील १० हेक्टर भूमी अधिग्रहित करण्याचा प्रस्तावही तयार झाल्याचे समाेर येत आहे.

अजनीवनासाठी होणारा विरोध लक्षात घेत आयएमएस प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक येत्या ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेला गती देऊन काम वेगाने सुरू करण्यासाठी विविध विषय बैठकीच्या अजेंड्यावर आहेत. या बैठकीतील नीरीच्या जमिनीच्या विषयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयएमएस आणि वर्धा राेड इंटरचेेंजसाठी नीरीची ०.७५ हेक्टर म्हणजेच जवळपास दाेन एकराचा परिसर मागण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे एनएचआयएने या परिसराच्या सर्वेक्षणाची परवानगी मागितली हाेती, मात्र नीरीने दाेन वर्षापासून ही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नीरीच्या संचालकांनाही या बैठकीसाठी बाेलावण्यात आले आहे. याशिवाय राज्य शासनाकडून जेल परिसरातील १० हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा प्रस्तावही बैठकीत आहे. वर्धा राेडसाेबत आयएमएसच्या सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटीसाठी ही १० हेक्टर जागा आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बैठकीतील महत्त्वाचे विषय

- अजनी काॅलनी परिसराची ४४ एकर जागा रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (आरएलडीए) कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआयए) ला हस्तांतरित करणे आणि कामाला सुरुवात करणे.

- मनपाच्या उद्यान विभागाकडून वृक्षताेडीची परवानगी. ३० सेंटिमीटरपेक्षा अधिकचा बुंधा असलेली २९१० झाडे व त्यापेक्षा कमी आकाराची २३३० झाडे ताेडण्याची परवानगी.

- नियमानुसार ताेडण्याच्या तुलनेत पाचपट झाडे लावण्यासाठी उद्यान विभागाद्वारे उपयुक्त जागेची माहिती देणे.

- रेल्वे क्वाॅर्टर्स, कार्यालये, शाळा आदींच्या पुनर्वसनासाठीचे बांधकाम.

- राज्य शासनाची जेल व मेडिकल परिसराची भूमी वळती करणे.

- नीरीच्या ०.७५ हेक्टर परिसराचे सर्वेक्षण व अधिग्रहण.

- ३० हजार झाडे ताेडले जाण्याची भीती खरी

एनएचआएने आतापर्यंत आयएमएस प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अजनीवनाच्या ५५ एकरवर प्रकाश ठेवला. मात्र हा संपूर्ण प्रकल्प ४९० एकरांतील असून या संपूर्ण प्रकल्पासाठी ३० हजाराच्यावर झाडे ताेडली जाणार, ही पर्यावरणप्रेमींची भीती यामुळे खरी ठरल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Crisis on Neeri forest resources after Ajniwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.