ग्रामीण भागातील संकट टळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:24+5:302021-04-24T04:08:24+5:30
सावनेर / उमरेड/ नरखेड/ कुही /रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात २५९८ ...
सावनेर / उमरेड/ नरखेड/ कुही /रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात २५९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक ३१७ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ६९, तर ग्रामीण भागातील २४८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४, तर चिंचोली केंद्रांतर्गत ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
कळमेश्वर तालुक्यात ८१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील ४०, तर ग्रामीण भागातील ४१ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ९८ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातील ६६, तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्यात १२३ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील १४, तर ग्रामीण भागातील १०८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १९४८, तर शहरात ३४६ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत येणाऱ्या गावांत ३१, तर जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२१), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत (२८), तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत २८ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात १७३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील १९, तर ग्रामीण भागातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. कुही तालुक्यात ५३३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.