तिसऱ्या लाटेचे संकट ; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:41+5:302021-07-31T04:07:41+5:30

नागपूर : सर्दी, ताप, व्हायरल किंवा कोरोना हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. पण या सर्वांची लक्षणे समान असू शकतात. ...

The crisis of the third wave; Don't even take the heat off of children! | तिसऱ्या लाटेचे संकट ; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !

तिसऱ्या लाटेचे संकट ; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !

googlenewsNext

नागपूर : सर्दी, ताप, व्हायरल किंवा कोरोना हे आजार वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. पण या सर्वांची लक्षणे समान असू शकतात. त्यामुळे अशा स्थितीत कोरोना विषाणूची लागण झाली किंवा नाही हे कळणे थोडे अवघड होऊ शकते. या पार्श्वभूमीवर लक्षणे आढळून येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घेण्याच्या आरोग्य विभागाचा सूचना आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होणार असल्याने लहान मुलांचीही कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वातावरणातील बदलामुळे ‘व्हायरल’ रुग्णांत वाढ झाली आहे. यात लहान मुलांच्या अधिक संख्येमुळे काळजी वाढली आहे. साधारणपणे ‘व्हायरल’ची लागण झाल्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून येऊ शकतात. तसेच नाक गळणे, चोंदणे आणि सोबत खोकला अशीही लक्षणे असू शकतात. तर कोरोनाच्या लक्षणात तीव्र ताप, सततचा खोकला, चव, गंध जाणे यातील एकतरी लक्षण हमखास आढळून येतात. पण, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये नाक गळणे, घसा खवखवणे, डोकेदुखी आदी लक्षणेही आढळून आली आहेत. यामुळे कोरोनाच्या गंभीर धोक्याला टाळण्यासाठी व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी ताप आलेल्या लहान मुलांची कोरोना तपासणी करणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-ताप आला म्हणजे कोरोना नाही, पण...

बालरोग तज्ज्ञांच्या मते, नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संंख्या कमी झाली आहे. परंतु व्हायरल व डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. या तिन्ही आजारात ताप येतो. परंतु ताप आला म्हणजे कोरोना आहेच असे नाही, पण योग्य आजाराचे निदान झाल्यास शंकाकुशंकाना स्थान राहत नाही. तातडीने उपचार सुरू होतात व आजाराची गंभीरता टाळता येते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करणे गरजेचे ठरते.

-बालकांसाठी कोविड केअर सेंटर

कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बालकांसाठी कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. सोबतच मेया व मेडिकलमध्ये प्रत्येकी ५० तर, एम्समध्ये २०० खाटांचा वॉर्ड तयार होत आहे. यात काही बेड आयसीयू तर काही बेड ‘एचडीयू’चे असणार आहेत.

-लहान मुलांच्या चाचणी संदर्भात वेगळी सूचना नाही

सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची संभाव्य लक्षणे आहेत. ही लक्षणे असणाऱ्यांनी कोरोना तपासणी करण्याच्या सूचना आहेत. परंतु ताप आल्यावर प्रत्येक लहान मुलांची तपासणी करणे, अशा वेगळ्या सूचना नाहीत. सध्या डेंग्यू व व्हायरलचे रुग्ण वाढले आहेत. याची व कोरोनाची लक्षणे जवळपास सारखीच असतात. आजाराचे तातडीने निदान होऊन उपचाराखाली आणण्यासाठी संभाव्य आजारासोबतच कोरोनाची तपासणी करणे आवश्यक ठरते.

-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर

-दुसऱ्या लाटेत १९ वर्षांखालील बाधितांची संख्या

जानेवारी : ९०३

फेब्रुवारी : १७४१

मार्च : ६९६६

एप्रिल : २०८१०

एकूण : ३०४२०

Web Title: The crisis of the third wave; Don't even take the heat off of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.