‘सीआरएमएस’ने केला रेल्वेतील खासगीकरणाला विरोध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:28+5:302021-09-17T04:13:28+5:30
नागपूर : नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने शासनाच्या खासगीकरण आणि कामगार विरोधी धोरणाविरुद्ध ...
नागपूर : नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या निर्देशानुसार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने शासनाच्या खासगीकरण आणि कामगार विरोधी धोरणाविरुद्ध विरोध सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
विरोध सप्ताहात विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बंडू रंधई होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव जी. एम. शर्मा, बी. पी. दुबे, सी. पी. सिंह, शीतल मंत्री उपस्थित होते. यावेळी विविध शाखांचे पदाधिकारी ओ. पी. शर्मा, वाय. डब्ल्यू. गोपाल, बब्बू वृंदावन, विजय बुरडे, रिना आर्य, एकनाथ लोंदासे, शिवाजी बारस्कर, बन्समनी शुक्ला, मोहम्मद मुजाहिद, सूरज कोडापे, प्रमोद खिरोडकर, मनोज सपकाळ, पी. दत्ता, दिनेश धनवटे, डी. पी. ग्रोवर, डी. डी. सिंह, सतीश मीणा, बलराम शाहू, सतीश दुबे, राजू पाठेकर, बी. के. भुयान, दिनेश आत्राम, राजू सोनकुसरे, लक्ष्मीकांत वैद्य, यशवंत मते, कैलाश फुल्लेवर, अंबी नायर, दीपक गावंडे उपस्थित होते. द्वारसभेत खासगीकरण, रेल्वे संपत्ती विकणे, रेल्वेतील रोजगार कमी करणे, खासगी रेल्वेगाड्या आणि कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. संचालन अभिजित यांनी केले. आभार वाय. डब्ल्यू. गोपाल यांनी मानले.
.................