CronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ८ हजाराहून २०० वर आली रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 09:39 PM2021-06-01T21:39:29+5:302021-06-01T21:39:55+5:30
CronaVirus कोरोनाचा दुसऱ्या लाटेने चिंता वाढवली होती. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी ७९९९ रुग्ण आढळून आले होते; परंतु महिन्याभरात रुग्णसंख्या कमी झाली. मंगळवारी दैनंदिन रुग्णसंख्या २०३ वर आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सलग दोन महिन्यांनंतर ग्रामीणमधील दैनंदिन रुग्णसंख्या १००च्या खाली आली. आज ५७ रुग्ण व ४ मृत्यूची तर, शहरात १४२ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेने चिंता वाढवली होती. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी ७९९९ रुग्ण आढळून आले होते; परंतु महिन्याभरात रुग्णसंख्या कमी झाली. मंगळवारी दैनंदिन रुग्णसंख्या २०३ वर आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सलग दोन महिन्यांनंतर ग्रामीणमधील दैनंदिन रुग्णसंख्या १००च्या खाली आली. आज ५७ रुग्ण व ४ मृत्यूची तर, शहरात १४२ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चाचण्यांची संख्या वाढली. १०,५४५ चाचण्यांमधून शहरात ६८५९ तर ग्रामीणमध्ये ३६८६ चाचण्या झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर १.९२ टक्के, शहराचा २.०७ टक्के तर ग्रामीणचा १.५४ टक्के होता. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३,३१,१९८ व मृतांची संख्या ५२४९ झाली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णसंख्या १,४२,०५३ तर बळींची संख्या २,२९० वर पोहोचली आहे. आज ८३३ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६.९४ टक्क्यांवर आले आहे. आतापर्यंत शहरातील ३,२३,०१३ तर ग्रामीणमधील १,३७,२६२ असे एकूण ४,६०,२७५ रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाचे ५६१९ रुग्ण सक्रिय
कोरोनाचा सक्रिय रुग्णांतही मोठी घट आली आहे. शहरात सध्याच्या स्थितीत ३५२२ तर ग्रामीणमध्ये २०९७ असे एकूण नागपूर जिल्ह्यात ५६१९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील होम आयसोलेशनमध्ये ३,६९९ तर शासकीयसह खासगी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये १९२० रुग्ण उपचाराखाली आहेत. सध्याच्या स्थितीत जवळपास ९० टक्के बेड उपलब्ध असल्याने प्रशासनाची चिंता मिटली आहे.
कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १०,५४५
शहर : १४२ रुग्ण व ६ मृत्यू
ग्रामीण : ५७ रुग्ण व ४
ए. बाधित रुग्ण :४,७४,८०८
ए. सक्रिय रुग्ण : ५६१९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६०,२७५
ए. मृत्यू : ८,९१४