नागपूर जिल्ह्यात १६,३५१ हेक्टर क्षेत्रातील पीक व फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:26 PM2018-02-19T22:26:17+5:302018-02-19T22:34:26+5:30

गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

Crop and fruit loss in 16,351 hectare area in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात १६,३५१ हेक्टर क्षेत्रातील पीक व फळांचे नुकसान

नागपूर जिल्ह्यात १६,३५१ हेक्टर क्षेत्रातील पीक व फळांचे नुकसान

Next
ठळक मुद्देअवकाळी पाऊस व गारपीट : चार दिवसात सर्वेक्षण पूर्ण२० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेशनुकसानीचा अहवाल शासनाला सादरगहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, केळी आदी फळे तसेच गहू, हरभरा व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनातर्फे बाधित क्षेत्रातील नुकसानीचे सर्वेक्षण चार दिवसात पूर्ण करून नुकसान झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान शेती व फळ पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर संत्रा, मोसंबी, केळी व इतर पिकांचे काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी आदी तालुक्यातील नुकसानीचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईसाठी २४ कोटी ८५ लक्ष रुपये निधी लागणार आहे.
गारपिटीमुळे गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये काटोल तालुक्यातील ६ हजार ८८.३१ हेक्टर शेत पिकांचा समावेश असून, ७ हजार ३४७ बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ८ कोटी २१ लक्ष रुपयाचे अनुदान लागणार आहे. नरखेड तालुक्यातील २ हजार १९७ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, बाधित ३ हजार २७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी २ कोटी ९६१ लक्ष रुपयाचा निधी लागणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ८३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, बाधितांमध्ये १ हजार ३३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नुकसानभरपाईसाठी १ कोटी ४६१ लक्ष रुपये, सावनेर २९७.३० हेक्टर आर, ३९५ शेतकरी नुकसान ४० लाख, पारशिवनी ३० हेक्टर ५३ शेतकरी, रामटेक ५५ हेक्टर आर १३० शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. कोरडवाहू पिकाखालील बाधित क्षेत्रामध्ये एकूण १५९.६९, आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या बाधित क्षेत्रामध्ये ९ हजार ७५१.११ हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकाखाली बाधित क्षेत्रामध्ये ६ हजार ४३०.८२ हेक्टर आर अशा एकूण १६ हजार ३५१.६२ हेक्टर आर बाधित क्षेत्राचा समावेश आहे.
गारपिटीमुळे व वादळी पावसामुळे शेती व फळ पिकांचा ३३ ते ५० टक्के व ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे व त्यानुसार नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
संत्रा व मोसंबी फळांचे नुकसान
वादळी पाऊस व गारपिटीमुळे पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, केळी व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काटोल तालुक्यातील २ हजार ७०० हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसानीचा समावेश असून ३ हजार ६७ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्यातील १ हजार ८१९ हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून २ हजार ४१७ बाधित शेतकरी आहेत. नुकसानभरपाईसाठी ३ कोटी २७ लाख रुपये. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून १ हजार ९०९ शेतकरी बाधित आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राकरिता ३ कोटी २०लक्ष रुपये निधी लागणार आहे.
सावनेर तालुक्यातील १२४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले असून १३३ शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील ४ हेक्टर आर क्षेत्रामध्ये नुकसान झाले असून पाच शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

Web Title: Crop and fruit loss in 16,351 hectare area in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.