गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:03 AM2017-07-19T02:03:15+5:302017-07-19T02:03:15+5:30

परिसरात नॅचरोपॅथीच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सूत्रधारासह तिघांना अटक केली.

Cross-country bank in Gokulpet | गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा

गोकुळपेठेत देहव्यापार अड्डा

Next

सूत्रधारासह तिघांना अटक : नॅचरोपॅथीत हा कोणता उपचार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिसरात नॅचरोपॅथीच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सूत्रधारासह तिघांना अटक केली. लोकमतने १७ जुलैला ‘पोलिसांच्या आश्रयात देहव्यापार ’या आशयाची बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. चार महिन्यापासून अंबाझरी ठाण्याच्या परिसरात
गोकुळपेठच्या भास्कर अपार्टमेंटमध्ये केअर नॅचरोपॅथी क्लिनिक सुरू झाले होते.
यात देहव्यापार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना होती. परंतु पोलिसांनी त्याकडे गंभीरतेने घेतले नाही. लोकमतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाची कानउघाडणी केली. वरिष्ठांच्या कानउघाडणीने सतर्क झालेल्या पथकाने मंगळवारी बनावट ग्राहक क्लिनिकमध्ये पाठविला. त्याच्याकडून सिग्नल मिळताच पोलिसांनी धाड टाकली.
पोलिसांना क्लिनिकची सूत्रधार मीनाक्षी ऊर्फ मीना पंढरी खारकर (२९) चंदननगर, प्रीती निखिल शर्मा गांधीबाग व मोहसिन खान सना खान (२८) रा. छावणी मशीद तेथे सापडल्या. पोलिसांकडून कारवाई होत असल्याचे लक्षात येताच मीनाने कारवाईपासून बचाव करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु पोलिसांनी तिचे प्रयत्न अयशस्वी ठरविले.
सूत्रांच्या मते, शहरातील बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांना या अड्ड्याची माहिती होती. त्यांनी एसीबीला कारवाईचे निर्देशही दिले होते. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखविली नाही. परंतु लोकमतच्या वृत्ताने खळबळ उडाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मीनाने एका बिल्डरकडून फ्लॅट किरायाने घेतला होता. या प्रकाराची बिल्डरलाही माहिती होती. त्यामुळे बिल्डरचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सूत्राच्या माहितीनुसार एसीबीकडून होत नसलेल्या कारवाईत जॉन नावाच्या दलालाची महत्त्वाची भूमिका आहे. दलालाच्या माध्यमातून आर्थिक पुरवठा होत होता. ही कारवाई उपायुक्त श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक शुभदा शंके यांच्या पथकाने केली.

Web Title: Cross-country bank in Gokulpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.