‘क्रॉसबो माईल्स’; एक पाऊल महिला सबलीकरणासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:02 AM2017-12-23T10:02:58+5:302017-12-23T10:03:49+5:30

महिलांमध्ये सुरक्षेची भावना रुजविणे, सशक्तीकरण करणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळवून देण्याच्या हेतूने देशव्यापी पातळीवर परिवर्तनाची मोहीम राबविण्यात येत आहे.

'Crossbow Miles'; One step for women empowerment ... | ‘क्रॉसबो माईल्स’; एक पाऊल महिला सबलीकरणासाठी...

‘क्रॉसबो माईल्स’; एक पाऊल महिला सबलीकरणासाठी...

Next
ठळक मुद्देसृष्टी बक्षी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ३८०० किमी पदयात्रा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : महिलांमध्ये सुरक्षेची भावना रुजविणे, सशक्तीकरण करणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळवून देण्याच्या हेतूने देशव्यापी पातळीवर परिवर्तनाची मोहीम राबविण्यात येत आहे. ‘क्रॉसबो माईल्स’ नावाने सुरू असलेल्या या मोहिमेत डिजिटल आणि आर्थिक साक्षरता ही उद्दिष्टे साकारण्याचा प्रयत्न असेल.‘ ‘कॅम्पेन फॉर चेंज’ अर्थात बदल घडविण्यासाठी मोहिमेच्या मुख्य सूत्रधार आहेत सृष्टी बक्षी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय महिला आयोगाच्या पाठिंब्याने सृष्टी हा प्रकल्प राबवित आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा...
सृष्टी बक्षी या कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३८०० किमी पदयात्रा करीत असून १५ सप्टेंबर रोजी त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. २६० दिवसांत १२ राज्यांतील २० प्रमुख शहरे तसेच अनेक खेड्यांना भेटी दिल्यानंतर त्या एप्रिल महिन्यात काश्मीरला पोहोचतील. आतापर्यंत एक हजार किमी अंतर पूर्ण करीत नागपूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. २३ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात त्या नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला कार्यशाळा आणि चर्चासत्रे घेणार आहेत. याशिवाय काही खेड्यांना भेटी देत तेथील महिलांमध्ये जागरुकता निर्माण करतील.
आतापर्यंत मार्गातील अनेक गावात त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी लोकांचे मतपरिवर्तन केले. त्यांच्या परिश्रमाला साद घालून अनेक जण मोहिमेशी जुळले आहेत. विविध शहरात काही सामाजिक संस्था, युवा आणि व्यावसायिक ग्रूपच्या सहकार्याने कार्यशाळा आणि चर्चासत्रांचेही आयोजन करीत आहेत. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि बरोबरीच्या अधिकारासाठी, महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून त्या पाठिंबा मागत आहेत. अनेक गावांमधील महिलांचा संघर्ष आणि त्यांच्यात जागविलेला आत्मविश्वास वृत्तपटाच्या माध्यमातून संग्रहित देखील करीत आहेत.

‘क्रॉस बो’ला पाठिंबा देण्यासाठी हे करा...
‘क्रॉस बो’ अ‍ॅप ‘अ‍ॅपल स्टोअर’ आणि ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला स्वत:चा पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन सृष्टी यांनी केले आहे.

‘क्रॉस बो’पदयात्रा आज नागपूर जिल्ह्यात
शनिवार(२३ डिसेंबर): जाम परिसरात ४१ किमी पदयात्रा, रविवार: चिमनाझरी थेये ३७ किमी पदयात्रा मंगळवार: मानापूर गवसी येथे पदयात्रा व मातृसेवा संघ येथे चर्चासत्र, बुधवार:कामठी रोड आणि हिस्लॉप कॉलेज येथे कार्यशाळा, गुरुवार: सायंकाळी कोराडी नाका परिसरात ‘नाईट वॉक’. शुक्रवार आणि शनिवार: सावनेर परिसरात ३७ किमी पदयात्रा आणि कार्यशाळा.

Web Title: 'Crossbow Miles'; One step for women empowerment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला