वाड्यावर गर्दी, ६० दिव्यांनी ओवाळले

By Admin | Published: May 28, 2017 02:20 AM2017-05-28T02:20:59+5:302017-05-28T02:20:59+5:30

भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील नेते,

The crowd in the castle, waved with 60 lamps | वाड्यावर गर्दी, ६० दिव्यांनी ओवाळले

वाड्यावर गर्दी, ६० दिव्यांनी ओवाळले

googlenewsNext

मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्त्यांची गदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील नेते, महाराष्ट्राचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांनी शनिवारी सकाळपासूनच गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी एकच गर्दी केली.
आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही आदींनी गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे तसेच यांच्या विविध सामाजिक, व्यावसायिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक संघटना आणि असोसिएशनने त्यांचे अभिष्ठचिंतन केले तत्पूर्वी सकाळी गडकरी यांना पत्नी कांचन गडकरी, सूना आणि नातेवाईकांनी मंत्रोच्चारात ६० दिव्यांनी ओवाळले. सर्वांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. घराची सजावट फुलांनी केली होती. गडकरी यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांनी सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी केली होती. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून शुभेच्छा स्वीकारल्यानंतर गडकरी ८.४५ वाजता फुलांनी सजविलेल्या स्टेजवर उभे राहिले. गडकरी यांनी सभागृहात दिव्यांगांना भेटवस्तू प्रदान केल्या.

Web Title: The crowd in the castle, waved with 60 lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.