लोकमत शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:58 AM2019-06-14T00:58:57+5:302019-06-14T00:59:56+5:30
विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादासोबत लोकमत शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला. तीन दिवसीय आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन वर्षातून दोनदा करावे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादासोबत लोकमत शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला. तीन दिवसीय आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन वर्षातून दोनदा करावे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी लोकमतशी बोलताना दिली.
प्रदर्शनात इयत्ता दहावी आणि बारावीत उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालकासोबत विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर जाऊन विविध कोर्सेस आणि प्रवेशाची माहिती जाणून घेतली. नागपूरसह पुणे, मुुंबई, बेंगळुरू येथील शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँकेच्या स्टॉलवर देशविदेशातील कर्ज योजनांची माहिती घेतली.
विविध कोर्सेस आणि उच्च पगाराच्या रोजगाराची माहिती देण्यासाठी तीन दिवसात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांतर्फे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विविध कोर्सेसच्या बारीकसारीक बाबी आणि प्रवेशावर मार्गदर्शन केले. गुरुवारी सहा चर्चासत्र झाले. त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घेतला.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनात मेडिकल, इंजिनिअरिंग, फॅशन, ग्राफिक्स, अॅनिमेशन, स्पर्धा परीक्षा, डिझायनिंग, कलात्मकता, आयटी, गेमिंग आणि आर्ट सारख्या विविध कोर्सेसची माहिती एकाच छताखाली देण्यात आली. प्रदर्शनात ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांचे स्टॉल होते. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक द युनिक अकॅडमी, सहप्रायोजक एमिटी विद्यापीठ आणि स्टेट बँक बँकिंग पार्टनर होते. रेडियो पार्टनर रेड एफएम आणि डिजिटल पार्टनर अॅडवॅम्स होते.
भाग्यशाली सोडतीचे विजेते
लोकमत शैक्षणिक प्रदर्शनात तीन दिवस भाग्यशाली सोडत काढण्यात आली. अखेरच्या दिवशी कार्तिक विजय कानेकर, सृष्टी भोजेवार, अदिती गडीकर आणि अभय मेश्राम विजेते ठरले. सर्वांना आकर्षक ब्लूटूथ स्पीकर देण्यात आले. याशिवाय चर्चासत्रात विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.