बँकेसमाेरील खातेदारांची गर्दी धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:14+5:302021-06-04T04:08:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील अग्रवाल भवनासमोरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बँक खातेदारांनी रकमेची उचल करण्यासाठी गुरुवारी (दि. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील अग्रवाल भवनासमोरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बँक खातेदारांनी रकमेची उचल करण्यासाठी गुरुवारी (दि. ३) सकाळी माेठी गर्दी केली हाेती. यात बहुतांश विविध शासकीय याेजनांचे लाभार्थी हाेते. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा फज्जा उडाल्याने ही गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडू शकणारी असल्याने धाेकादायक असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले.
कामठी शहरातील अग्रवाल भवनासमोर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या याेजनांच्या बऱ्याच लाभार्थ्यांची बचत खाती आहेत. यातील बहुतांश लाभार्थी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात असून, या मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात नियमित जमा केली जाते. मागील चार महिन्यांपासून त्यांना ही मदत मिळाली नसल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले.
...
स्वतंत्र काऊंटर सुरू करा
त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या रकमेची उचल करण्यासाठी बँक शाखेसमाेर गर्दी करीत सकाळी ९ वाजतापासून रांग लावायला सुरुवात केली हाेती. या रांगेत फिजिकल डिस्टन्सिंग नावालाही नव्हते. शिवाय, काहींनी मास्क वापरले नव्हते तर काहींनी ते व्यवस्थित लावले नव्हते. यात काेण पाॅझिटिव्ह व काेण निगेटिव्ह असेल, हे कळायला मार्ग नव्हता. या उन्हामुळे रांगेतील ज्येष्ठ नागरिकांचे हाल हाेत हाेते. ही बाब धाेकादायक असल्याचे काहींनी सांगितले. यावर उपाय म्हणून या लाभार्थ्यांसाठी बँकेने काही काळ स्वतंत्र काऊंटर सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
030621\img_20210601_113803.jpg
===Caption===
ज्येष्ठ नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँक ऑफ इंडिया समोर केलेली गर्दी