कोंढाळीतील बाजारात ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:44+5:302021-05-05T04:14:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने बहुतांश दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काेंढाळी येथील बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक राेज गर्दी करीत असल्याने काेंढाळीची हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काेंढाळी येथील बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याने पाेलिसांनी मंगळवारी (दि. ४) सकाळी पाच दुकानदारांविरुद्ध गुन्हे नाेंदविले. विशेष म्हणजे, यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार नाेंदविली हाेती.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीचा निर्णय घेत औषधांची दुकाने वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू व नंतर दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काेंढाळी येथील बाजार चाैक व मेन राेडवर किराणा, बेकरी व इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आहेत. याच मार्गावर राेज भाजीपाला विक्रेते त्यांची दुकाने थाटतात. ही दुकाने किराणा, बेकरीसमाेर किंवा बाजूला थाटलेली असल्याने तसेच हा मार्ग अरुंद असल्याने तेथे ग्राहकांची माेठी गर्दी हाेते. परिणामी, या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले जाते.
दरम्यान, बाजारातील ही गर्दी धाेकादायक असल्याने तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने उघडी ठेवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी पाेलिसांना माहिती दिली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बाजाराची पाहणी करीत शेख नदीम युनूस मेमन (३१), गफार अब्दुल करीम मुसानी (४०), विकास जिनेश्वर उमाठे (५६), शेख ताजमिर (५०) व मोहम्मद सौफियान कुद्दुस मुसानी (२५) या पाच दुकानदारांविरुद्ध अधिक काळ दुकाने सुरू ठेवल्याने भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला, अशी माहिती ठाणेदार यांनी दिली.
...
दुकानांची वेळ दुपारी १ पर्यंत करा
ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाल्याची दुकाने थाटण्यासाठी नवीन आठवडी बाजारात व्यवस्था केली आहे. मात्र, भाजीपाला विक्रेते त्या जागेवर कमी आणि मुख्य मार्गालगत अधिक दुकाने थाटतात. त्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सकाळी ७ वाजता बाजारात दुकाने थाटणे किंवा उघडणे तसेच खरेदीसाठी बाजारात येणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ही वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत करावी, अशी मागणीही केली जात आहे.