विवाह समारंभांतील गर्दी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:10 AM2021-02-16T04:10:45+5:302021-02-16T04:10:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात नवीन ९ हॉटस्पॉट बनल्यानंतर मनपा प्रशासनाची झोप उडाली आहे. कोविडबाधितांचा शोध घेण्यासोबतच ...

Crowds at wedding ceremonies are dangerous | विवाह समारंभांतील गर्दी धोकादायक

विवाह समारंभांतील गर्दी धोकादायक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात नवीन ९ हॉटस्पॉट बनल्यानंतर मनपा प्रशासनाची झोप उडाली आहे. कोविडबाधितांचा शोध घेण्यासोबतच परिसरातील नागरिकांचा सर्व्हे करण्यात मनपा प्रशासन लागले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यावेळी कोणताही कामचुकारपणा खपवून घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांनी आधीच मंगल कार्यालये, लॉन, सभागृहात नियमांचे उल्लंघन केले, अधिक गर्दी झाली, तर मंगल कार्यालय सील करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानही मनमानी न थांबल्यास पोलीस कारवाईचा पर्याय खुला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

१६ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी मोठ्या संख्येत लग्न समारंभ आहेत. लग्न समारंभामध्ये सर्रासपणे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अशी ठिकाणे कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय मनपा आयुक्तांद्वारे घेण्यात आला आहे. शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. मनपाच्या शोध पथकाने प्रत्येक मंगल कार्यालय, लॉनवर नजर ठेवली आहे.

यातूनच सोमवारी नरेंद्रनगर परिसरातील मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली. कारवाई रोखण्यासाठी एका नेत्याने एनडीएस पथकावर दबाव आणला होता. मात्र, दबावाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.

...

अनियंत्रित गर्दीमुळे संसर्ग वाढला

शहरात कोविड संक्रमणामुळे ९ हॉटस्पॉट झाले आहे. येथील संक्रमणाचा शोध घेतला असता, प्राथमिक अंदाजानुसार विवाह समारंभात होणाऱ्या गर्दीमुळे संसर्ग वाढत असल्याचे पुढे आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. विवाह समारंभात नागरिक मास्कचा वापर करीत नाही. बराच वेळ एकाच जागी गर्दी असते. नियमांचे पालन होत नाही. यामुळे संक्रमणाचा धोका असल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Crowds at wedding ceremonies are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.