आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:32 AM2017-08-28T01:32:50+5:302017-08-28T01:33:43+5:30

सध्या सत्तेत असलेले सरकार हे आरक्षण विरोधी आहे. आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे ते थेट हटविता येत नाही, म्हणून न्यायालयाचा आधार घेऊन आरक्षण संपविण्याचे षड्यंत्र सुरू आहे.

Crush the conspiracy to end the reservation | आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र हाणून पाडा

आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र हाणून पाडा

Next
ठळक मुद्देपर्दाफाश परिषद : सुरेश माने यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या सत्तेत असलेले सरकार हे आरक्षण विरोधी आहे. आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे ते थेट हटविता येत नाही, म्हणून न्यायालयाचा आधार घेऊन आरक्षण संपविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. आरक्षण समर्थकांनी एकजूट होऊन हे षड्यंत्र हाणून पाडावे, असे आवाहन बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी येथे केले.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे (बीआरएसपी) रविवारी उंटखाना येथील अजंता सभागृहात आरक्षण विरोधी षड्यंत्र पर्दाफाश परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते दशरथ मडावी, सिद्धार्थ पाटील, मुस्लीम आरक्षण आंदोलनाचे नेते प्रा. जावेद पाशा, आॅल इंडिया ट्रायबल एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मधुकर उईके, ज्ञानेश्वर मडावी, नयना धवड, छाया कुरुटकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सुरेश माने म्हणाले, चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेमुळे भारतीय समाजात सर्व क्षेत्रात प्रचंड विषमता निर्माण झाली. त्याचे दुष्परिणाम देशाला व देशातील ८५ टक्के बहुजन समाजाला भोगावे लागले. भारतात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाने सर्व मागासलेल्या लोकांसाठी आरक्षणाचे तत्त्व स्वीकारले. परंतु मनुवादी मानसिकतेच्या सत्ताधाºयांकडून आरक्षण धोरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे बराच मोठा वर्ग आरक्षणापासून वंचित राहिला. अलीकडे केंद्र व राज्य सरकारांनी आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दलित-आदिवासी-ओबीसी-भटके विमुक्त तथा अल्पसंख्यांक समुदायाच्या सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आमदार व खासदारांनी याविरोधात आवाज उचलावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले. संचालन डॉ. रमेश जनबंधू यांनी केले. डॉ. विनोद डोंगरे यांनी आभार मानले.
पदोन्नतीसाठी बीआरएसपीही न्यायालयात जाणार
अलीकडेच न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिला आहे. याचा प्रतिकार करण्याची गरज आहे. बीआरएसपीतर्फे याविरोधात न्यायालयात रिट पीटिशन दाखल करण्यात येईल, असेही डॉ. सुरेश माने यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात समारोप
आरक्षण विरोधी षड्यंत्राबाबत बीआरएसपीतर्फे महाराष्ट्रात सर्वत्र जनजागृती करण्यासाठी पर्दाफाश परिषद आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या परिषदा होतील. २४ सप्टेंबर रोजी पुण्यात या परिषदेचा समारोप करण्यात येणार आहे.

Web Title: Crush the conspiracy to end the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.