खर्रा वाढवतोय मुख कर्करोगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:40 AM2017-09-16T00:40:47+5:302017-09-16T00:41:05+5:30

उपराजधानीत खºर्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे. चौकाचौकांमधील खºर्याचे पानठेले अभिशाप ठरत आहेत.

Crystal is the main source of oral cancer | खर्रा वाढवतोय मुख कर्करोगाचे प्रमाण

खर्रा वाढवतोय मुख कर्करोगाचे प्रमाण

Next
ठळक मुद्देसहा महिन्यात ६८ रुग्ण : तर मुखपूर्व कर्करोगाचे ३८० रुग्ण

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत खºर्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे. चौकाचौकांमधील खºर्याचे पानठेले अभिशाप ठरत आहेत. शासकीय दंत महाविद्यालयाने नुकताच केलेल्या एका अभ्यासातून खºर्यामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे. यात जानेवारी ते जुलै या सहा महिन्यात खर्रा खाणाºया ३८० व्यक्तींमध्ये मुखपूर्व कर्करोगाची लक्षणे दिसून आली तर ६८ व्यक्तींना मुख कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.
राज्यात कुठे नसतील एवढे पानठेले एकट्या विदर्भात आहे. यातील बहुसंख्य पानठेल्यावरून खºर्याची विक्री होते. अलीकडे किराणा दुकानांमधूनही खºर्याची विक्री होत असल्याने लहानपणापासूनच खºर्याचे व्यसन लागत आहे. परिणामी, वयाच्या तिशीतच कर्करोगाची लागण झाल्याची शेकडो उदाहरणे समोर येत आहेत.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने या संदर्भात नुकताच एक अभ्यास केला. जानेवारी ते जुलै २०१७ या दरम्यान रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची नोंदी ठेवल्या. यात खर्रा खाणाºयांची वेगळी माहिती ठेवली.
ते किती वर्षांपासून खर्रा खात आहे, त्यांच्यात मुखपूर्व कर्करोगाचे (ओरल सबम्युकस फायब्रोसिस) व मुख कर्करोगाचे (ओरल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा) प्रमाण किती यावर अभ्यास सुरू केला. तूर्तास तरी गेल्या सहा महिन्यात ११० व्यक्तींना मुखाचा कर्करोग झाल्याचे सामोर आले आहे. यात केवळ खºर्यामुळे ६८ व्यक्तींचा समावेश असून खºर्यासोबतच, तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, पानमसाला खाणाºयांची संख्या ४२ आहे.

तरुणांची संख्या अधिक
खर्रा खाणाºयांमध्ये १५ ते ४० वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. याच वयोगटात मुखपूर्व कर्करोगाचे व मुख कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा महिन्यात मुखपूर्व कर्करोगाचे ४१५ रुग्णांचे निदान झाले असून यात खर्रा खाणाºयांची संख्या ३८० एवढी आहे.
‘एफडीए’ला हा डाटा देणार
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने गेल्या सहा महिन्यात खºर्यावर केलेल्या अभ्यासाचा डाटा अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिला जाणार आहे. हेतू हाच की खºर्यावर निर्बंध यायला हवे. खºर्यामुळे तरुण पिढी जीवघेण्या मुख कर्करोगाला सामोरा जात आहे.
-डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Crystal is the main source of oral cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.