सीएस दीप्ती जोशी डब्ल्यूआयआरसीच्या सचिवपदी
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 10, 2024 08:46 PM2024-02-10T20:46:51+5:302024-02-10T20:47:31+5:30
डब्ल्यूआयआरसीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोवा ही पाच राज्ये आणि दमण-दीव व दादरा-नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवस्थापनाचा कार्यभार आहे.
नागपूर : सीएस दीप्ती जोशी यांची इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) सचिवपदी वर्ष २०२४-२५ करिता निवड झाली आहे. डब्ल्यूआयआरसीच्या कार्यकारी मंडळावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या नागपूरकर कंपनी सेक्रेटरी आहे. डब्ल्यूआयआरसीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोवा ही पाच राज्ये आणि दमण-दीव व दादरा-नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवस्थापनाचा कार्यभार आहे.
दीप्ती जोशी आयसीएसआयच्या फेलो सदस्य, दीप्ती जोशी अँड असोसिएट्सच्या संस्थापक सदस्य असून पोशच्या अधिकृत ट्रेनर आहेत. त्यांना अखिल भारतीय स्तरावर कॉर्पोरेट सल्लागार म्हणून काम करण्याचा १५ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी २०२३ साली डब्ल्यूआयआरसीच्या विद्यार्थी समितीचे नेतृत्व केले आहे.