महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी

By मंगेश व्यवहारे | Published: January 4, 2024 08:15 PM2024-01-04T20:15:56+5:302024-01-04T20:16:06+5:30

मनपाचा कौटिल्य कन्सल्टन्सीसोबत सामंजस्य करार

CSR fund that will bring 'Kautilya' to the municipal corporation | महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी

महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी

नागपूर: नागपूर शहरात आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, झोपडपट्टी विकास आदी क्षेत्रांतील विविध विकासकामे करण्यासाठी आता नागपूर महानगरपालिकेला सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीची साथ मिळणार आहे. यासंदर्भात गुरूवारी नागपूर महानगरपालिका आणि कौटिल्य कन्सल्टन्सी एलएलपी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

नागपूर महानगरपालिका आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी आणि कौटिल्य कन्सल्टन्सीचे धनंजय महाजन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कौटिल्य कन्सल्टन्सी ही मनपाच्या विविध विभागांना आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सुविधा व इतर क्षेत्रांत सीएसआर अंतर्गत निधी प्राप्त करण्यासाठी सहकार्य करणार आहे. विविध उद्योगांमधून सीएसआर निधी प्राप्त करण्यासाठी, शहर विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्पांची निवड करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. कौटिल्य कन्सल्टन्सीचे सदस्य धनंजय महाजन, पंकज पाटील, मनीष कुदळे, संदेश जोशी, ऋग्वेद येनापुरे, दुशांत बोंबोडे, तेजस ठाकूर यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या महात्मा गांधी नॅशनल फेलो कार्यक्रमांतर्गत विविध जिल्ह्यांतील विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली काम केले आहे.

- काय करणार कौटिल्य कन्सलटन्सी
मनपाने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांना निधी मिळवून देण्याकरिता मनपा आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून कौटिल्य कन्सल्टन्सी काम करणार आहे. कंपनी सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी काम करणार आहे. तसेच मनपा हद्दीतील शाश्वत सामाजिक, आर्थिक विकास आणि समाज कल्याणासाठी संशोधन, विश्लेषण, नाविन्यपूर्ण डिझायनिंग, नियोजन आणि देखरेख कार्य प्रदान करणार आहे.

Web Title: CSR fund that will bring 'Kautilya' to the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर