...हा तर सदोष मनुष्यवध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:17+5:302021-09-18T04:09:17+5:30
नागपूर : आरोपीने रागाच्या भरात मृतावर हल्ला केला. खून करण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपी खून नाही तर, सदोष ...
नागपूर : आरोपीने रागाच्या भरात मृतावर हल्ला केला. खून करण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. त्यामुळे आरोपी खून नाही तर, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला.
गोपाल जानराव सारप असे आरोपीचे नाव असून तो चिखलगाव, जि. अकोला येथील रहिवासी आहे. मृताचे नाव मुकेश पेंढारकर होते. मुकेशने आराेपीच्या आजारी आईला वाहनात बसवले नाही. त्यामुळे आरोपीने चिडून मुकेशवर गुप्तीने वार केला होता. त्यामुळे मुकेशचा मृत्यू झाला. २५ जानेवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेता आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्याने आतापर्यंत भोगली तेवढी शिक्षा पुरेशी ठरवली. आरोपी २८ डिसेंबर २०१३ पासून कारागृहात होता. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.