सीताफळाच्या १५० राेपट्यांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 AM2021-08-24T04:12:36+5:302021-08-24T04:12:36+5:30
हिंगणा : ग्रामपंचायत पिंपळधरा व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्यावतीने पिंपळधरा (ता. हिंगणा) येथे वृक्ष लागवड अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...
हिंगणा : ग्रामपंचायत पिंपळधरा व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्यावतीने पिंपळधरा (ता. हिंगणा) येथे वृक्ष लागवड अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी पिंपळधरा, नागाझरी, कटंगधरा व मांडवा शिवारात सीताफळाच्या १५० राेपट्यांची लागवड करण्यात आली असून, वृक्ष संगाेपन व संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.
या अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ५० विविध जातींच्या राेपट्यांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नलिनी शेरकूर यांनी दिली. शिवाय, वृक्ष व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानात अंबुजा सिमेंट फाउंडेशन ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला विनोद आत्राम, मुख्याध्यापिका रामटेके, पोद्दार, पोटफोडे, पिसे, ग्रामसेवक नितीन उमरेडकर, आशा फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम शेरकुरे, अंबुजा फाउंडेशनच्या वसंती कडूकर, निखिल काटवे, सारिका रंगारी, इस्त्राईल महाजन, ईश्वर चिकराम, रामचंद्र भांगे, दीपक साखरे, संतोष भांगे, घनश्याम गायकवाड, दीपक रणदिवे यांच्यासह तरुण व नागरिक उपस्थित होते.