दर्जेदार शिक्षण देणारे कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:43+5:302021-01-22T04:08:43+5:30
नागपूर : महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला १२५ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. कमिन्स ...
नागपूर : महार्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला १२५ वर्षे पूर्ण झाली असून संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने २०१० मध्ये हिंगणा तालुक्यातील सुकळी, मिहान प्रकल्पाजवळ कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयाचा विदर्भात, राज्य पातळीवर राष्ट्रीतस्तरावर नावलौकिक आहे. महाविद्यालयात सीसीटीव्ही, शैक्षणिक वातावरण असलेला परिसर, विशाल ग्रंथालय, वसतिगृहाची सुविधा आहे. महाविद्यालयातील लॅबमध्ये विविध सॉफ्टवेअर, मायक्रो कंट्रोलर लॅब, सर्व हार्डवेअर व सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील रसिका बाकरे, वैष्णोवी गोगोई, गायत्री सुपतकर, अँजल सिल्का यांनी चांगले क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील विद्यार्थिनींना डिझाईन, बोटिक्स, थर्मल इंजिनिअरिंग, क्वाॅलिटी कंट्रोल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. येथे दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्यात येते. महाविद्यालयात स्वतंत्र अशा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून इंटर्नशीप व प्लेसमेंटची व्यवस्था नामांकित कंपन्यांमध्ये करण्यात येते. महाविद्यालयात विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना मिळतात. या संस्थेत शहरातील तसेच ग्रामीण भागातील मुलींना प्रवेश देणे सुरू असून, अधिक माहितीसाठी महाविद्यालयात संपर्क साधावा. (वा. प्र.)
.........