रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:01+5:302021-07-07T04:11:01+5:30

नागपूर : जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ४ लाख ६८ हजार ४२ रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ...

The cure rate is 98.07 percent | रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के

Next

नागपूर : जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ४ लाख ६८ हजार ४२ रुग्ण बरे झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के आहे. मंगळवारी शहर व जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद आहे. सध्या कोरोनाची लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्यात कोरोना डेल्टा प्लस वेरीअंट आढळून आला आहे. तरी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या कोविड त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी केले.

कन्हान-कामठी-खापरखेडा-कोराडी-बेसा या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी तेथील गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधला. डेल्टा प्लसच्या वेरिअंटमुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे. निर्बंधातील काही अंशी शिथिलतेमुळे कोविड पसरू नये यासाठी ब्रेक द चेन या आदेशाचे पालन करावे, असे ठाकरे यांनी सांगितले. प्रशासन लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवत आहे. लसीकरणासोबत सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Web Title: The cure rate is 98.07 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.