नागपुरात कर्फ्यू संपला, वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:25 PM2020-07-27T19:25:31+5:302020-07-27T19:31:54+5:30

महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गजबजल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढली.

Curfew ended in Nagpur, hustle and bustle increased | नागपुरात कर्फ्यू संपला, वर्दळ वाढली

नागपुरात कर्फ्यू संपला, वर्दळ वाढली

Next
ठळक मुद्देनागपूरकरांनो संयम ठेवा : बाजारपेठा फुलल्या, रस्तेही गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गजबजल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढली, सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी लोक पोहचले. भाजीचे बाजार पुन्हा सजले. लोक मोठ्या संख्येने घरातून निघाले. त्यामुळे शनिवार, रविवारी शहरात दिसून आलेला जनता कर्फ्यूचा असर सोमवारी उतरला होता.

मेडिकल चौक


लोकमतमध्ये रविवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मेडिकल चौकातील छायाचित्राने जनता कर्फ्यू किती यशस्वी ठरला याची प्रचिती करून दिली. पण सोमवारी या छायाचित्राच्या अगदी विपरीत परिस्थिती मेडिकल चौकात दिसून आली. चौकाच्या सभोवतालची दुकाने सुरू झाली. फुटपाथवरही दुकाने लागली. लोकांची खरेदी सुरू झाली. वाहनांची वर्दळ सभोवताली दिसून आली. दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास हे चित्र होते.

सीताबर्डी मेन रोड

सीताबर्डीच्या मेन रोडवर ऑड-इव्हन फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सोमवारी पण या फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरू झाली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका भागातील दुकाने पूर्ण सुरू होती. दुकानात ग्राहकांची गर्दी नसली तरी, मेन रोडवर लोकांची वर्दळ होती. घराबाहेर पडलेल्या लोकांची गर्दी लक्षात घेता, सीताबर्डी मार्केटमध्ये दुपारी गर्दी नसली तरी, दुपारी ४ नंतर नक्कीच गर्दी होईल.

सरकारी कार्यालयात वर्दळ कायम
सरकारी कार्यालयांना शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे त्यातच जनता कर्फ्यू असल्याने दोन दिवस पुरता शुकशुकाट होता. सोमवारी मात्र कार्यालये सुरू झाल्यापासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांबरोबर कामासाठी येणाऱ्यालोकांची गर्दी दिसून आली. सरकारी कार्यालय परिसरातील वाहनतळावरील वाहनांची संख्या लक्षात घेता, लोकांच्या गर्दीचा अंदाज बांधता येऊ शकत होता.

Web Title: Curfew ended in Nagpur, hustle and bustle increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.