Nagpur Violence: हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले," १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:55 IST2025-03-18T08:52:30+5:302025-03-18T09:55:02+5:30
Curfew imposed in Nagpur: नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Nagpur Violence: हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले," १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्..."
Nagpur Violence:औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटलं आहे.
"नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संचारबंदी लागू राहील," अशी माहिती नागपुरचे पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिली.
Nagpur (Maharashtra) violence | Curfew has been imposed in the Police station limits of Kotwali, Ganeshpeth, Lakadganj, Pachpaoali, Shantinagar, Sakkardara, Nandanvan, Imamwada, Yashodhara Nagar and Kapil Nagar in Nagpur city. This curfew will remain in force until further… pic.twitter.com/N3CqzKcMv1
— ANI (@ANI) March 17, 2025
पोलिसांनी काय सांगितले?
"सकाळी ११.३० वा. दरम्यान शिवाजी महाराज पुतळयासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूरचे कार्यकर्ते एकत्रित येवून सदर ठिकाणी २०० ते २५० कार्यकर्ते जमा होउन औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गणेशपेठ पोलीस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे संध्याकाळी १९.३० वा. सुमारे विशिष्ट समाजातील ८० ते १०० लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांवर दगडफेक केली व तागावाचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांततेला बाधा निर्माण झाली," अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली.