शहरात ३ एप्रिलपर्यंत जमावबंदी कलम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:26+5:302021-03-20T04:08:26+5:30

नागपूर : आगामी दिवसात होळी, धूलिवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुड फ्रायडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, मुस्लिम बांधवांतर्फे आयोजित ...

The curfew will be enforced in the city till April 3 | शहरात ३ एप्रिलपर्यंत जमावबंदी कलम लागू

शहरात ३ एप्रिलपर्यंत जमावबंदी कलम लागू

Next

नागपूर : आगामी दिवसात होळी, धूलिवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुड फ्रायडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती, मुस्लिम बांधवांतर्फे आयोजित शब-ए-बारात आदी विविध सण-उत्सव आहेत. तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षा होऊ घातल्या आहेत. यादरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, नागरिकांची गैरसोय, उपद्रव व नुकसान होऊ नये, यासाठी शहरात कलम ३३ (१), कलम ३६ तसेच कलम ३७ (१) (३) लागू करण्यात आले आहे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती विना परवाना एकत्र जमण्यास, शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, किंवा लाठ्या शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी इतर कोणतीही शस्त्रे बाळगणे, कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड, इतर क्षेपणास्त्र किंवा सोडावयाची, उपकरणे, व्यक्तीच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे ज्यामुळे शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. हे आदेश सरकारी किंवा निमसरकारी कर्मचारी, खासगी सुरक्षा व्यवस्थेत असलेले पहारेकरी, गुरखा, चाैकीदार, लग्न समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक सणांना लागू होणार नाही. हा आदेश २० मार्च मध्यरात्रीपासून ३ एप्रिल २०२१ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहील.

Web Title: The curfew will be enforced in the city till April 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.