आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: September 30, 2016 03:22 AM2016-09-30T03:22:48+5:302016-09-30T03:22:48+5:30
तो दुपारी १.४५ च्या सुमारास गोकुळपेठ भाजी बाजारात आला. त्याच्यासोबत पल्सरवर सुरेश होता.
नागपूर : तो दुपारी १.४५ च्या सुमारास गोकुळपेठ भाजी बाजारात आला. त्याच्यासोबत पल्सरवर सुरेश होता. या दोघांनी चहा घेतल्यानंतर बऱ्याच वेळेपासून दोन कार आणि एका दुचाकीवर प्रतिस्पर्धी टोळीतील काही जण पाठलाग करीत असल्याचे सचिनच्या लक्षात आले. त्यामुळे सचिन भाजीबाजारातून सटकण्याच्या विचारात होता.
भरबाजारात अन् ऐन पोलीस चौकीसमोर घडलेल्या या थरारक घटनेमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. अंबाझरी, सीताबर्डी पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. माहिती कळताच सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त राकेश कलासागर, सहायक पोलीस आयुक्त रिना जनबंधू यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अंबाझरीचे ठाणेदार किशोर सुपारे, सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतल्यानंतर आरोपींपैकी तिघांची नावे पुढे आली. सूरजच्या तक्रारीवरून अंबाझरी ठाण्यात राजा आणि साथीदारांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परतेकी हा कुख्यात गुंड असून, खंडणी वसुलीसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्यासोबत दोन मोठ्या वाहनात आठ ते दहा साथीदार होते.
गोळ्या झाडल्यानंतर याच वाहनातून आरोपी पळून गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांची विविध पथके आरोपींना शोधण्यासाठी कामी लागली. काही वेळेतच अंकित पाली आणि बिट्टू ऊर्फ अशपाकने पोलिसांकडे शरणागती पत्करल्याचे वृत्त आले. त्यानंतर राजा परतेकीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पोलीस त्याबाबत माहिती देण्याचे टाळत होते. (प्रतिनिधी)
मांडवली फिस्कटली
सचिनचा अलीकडे मोठा दरारा वाढला होता. त्याने खंडणी वसुलीसोबतच दारूचा धंदाही सुरू केला होता. राज्या परतेकी आणि त्याचे साथीदारही दारूच्या धंद्यात होते. त्यामुळे एका मध्यस्थाने दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यात मांडवली करण्याचा प्रयत्न केला होता. या मांडवलीच्या बैठकीत सचिन आणि त्याचे साथीदार तसेच राज्या, बिट्टू ऊर्फ अशपाक (मोमीनपुरा) आणि अंकित पाली (सुदामनगरी) होता, अशी माहिती आहे. यावेळी सूरजने दारूचा धंदा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, राज्या आणि त्याच्या साथीदारांनी मांडवली करण्यास नकार दिला. यावेळी त्यांच्यातील वैमनस्य तीव्र झाले. त्यानंतर सचिन आपला गेम करेल, अशी भीती वाटत असल्याने राज्याने सचिनचा गेम करण्याची तयारी केली अन् अखेर आज त्याने सचिनची भर बाजारात शेकडो लोकांसमोर हत्या केली.