फ्री व पेड चॅनलबाबत ग्राहक अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:25 AM2019-01-30T11:25:17+5:302019-01-30T11:26:02+5:30

केबल चालकांकडून तसेच ‘एमएसओ’कडून (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर) अजूनही यादी न आल्यामुळे आणि फॉर्म भरून न घेतल्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत.

Customers unaware about free and paid channels | फ्री व पेड चॅनलबाबत ग्राहक अनभिज्ञ

फ्री व पेड चॅनलबाबत ग्राहक अनभिज्ञ

Next
ठळक मुद्देट्रायच्या नवीन धोरणामुळे ग्राहक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ट्राय’च्या (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) नवीन धोरणानुसार फ्री टू एअर १०० चॅनल आणि पेड चॅनलची ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत निवड करायची आहे. परंतु केबल चालकांकडून तसेच ‘एमएसओ’कडून (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर) अजूनही यादी न आल्यामुळे आणि फॉर्म भरून न घेतल्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत.
अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे म्हणाले, ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे, प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयापर्यंत आणि जीएसटी १८ वरून ५ टक्क्यांवर आणावा. देशात एकूण ८८२ चॅनल असून त्यापैकी अन्य भाषेसह ५०० चॅनल फ्री टू एअर आहेत. त्यापैकी ग्राहकांना १०० फ्री चॅनल आवडीचे निवडायचे आहेत. या १०० चॅनलमध्ये २७ चॅनल दूरदर्शनचे सक्तीचे आहेत, तर ७३ चॅनलमध्ये न्यूज, धार्मिक, मनोरंजन, स्पोर्टस् व अन्य या चॅनलचा समावेश आहे. या १०० चॅनलसाठी ग्राहकांना १५३ रुपये द्यावे लागेल. याशिवाय व्यतिरिक्त पेड चॅनलमधून आवडीच्या चॅनलची निवड करायची आहे. त्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या चॅनलसाठी १० पैसे ते १९ रुपयांपर्यंत मोजावे लागणार आहे.
ग्राहकांना आवडीचे फ्री चॅनल व पेड चॅनलची निवड करण्यासाठी एमएसओ आणि केबल चालकांनी अजूनही यादी न दिल्यामुळे व फॉर्म भरून न घेतल्यामुळे तसेच बऱ्याच ठिकाणी केबलसेवा खंडित केल्यामुळे ग्राहक संभ्रमात असून ग्राहक पंचायतकडे वारंवार विचारणा करीत आहेत. सध्या एमएसओ यूसीएन, इनडिजिटल, जीटीपीएल व सिटीकेबल कार्यरत आहेत. यापूर्वी एमएसओमार्फत झी-ग्रुप, सोनी-ग्रुप, स्टार ग्रुप, कलर्स ग्रुप तसेच अन्य ग्रुपचे पॅकेजचे दर ठरलेले होते आणि पॅकेजचे मनमानी दर आकारल्या जात होते. ट्रायद्वारे पोर्टेबिलिटीची सुविधा आल्यास सेटटॉप बॉक्स बदलविण्याची आवश्यकता नाही. मोबाईलप्रमाणे केबल ऑपरेटर बदलणे सहज सोईचे होईल. केबलचालक व एमएसओने यादी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

Web Title: Customers unaware about free and paid channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.